रस्ता सुरक्षा सप्ताहा निमित्य उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

0
940

श्री शिवाजी महाविद्यालय व रोटरी क्लबचे संयुक्त आयोजन

आकोटः संतोष विणके

रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत ‘अपघात कसे टाळावे?’ या विषयावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.ते श्री शिवाजी महाविद्यालय व रोटरी क्लब आकोट संयुक्त विद्यमाने आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत जनजागृती कार्यक्रमात बोलत होते.

आपल्या देशात साधारणतः एक लाख अठ्ठेचालीस हजार लोक रस्ते अपघातात मरण पावतात. ही संख्या युद्धामध्ये मरण पावणाऱ्या व्यक्तींपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. अशा अपघातांमध्ये 18 ते 40 यात तरुण आणि कार्यक्षम वयोगटातील व्यक्तींची संख्या जास्त आहे. गाडी भरधाव वेगाने चालविणे, माहिती नसताना गाडी चालविणे, थकलेले आणि आजारी असतांना गाडी चालविणे आणि अतिउत्साह इत्यादी अपघाताच्या कारणांची विश्लेषणात्मक माहिती सादर केली.

वाहतूक नियमांचे पालन आणि सावधतेने वाहन चालविल्यास अपघात टाळू शकतो. ही माहिती पीपीटी प्रेझेन्टेशनद्वारा विनोद जिचकार यांनी दिली.
याप्रसंगी व्यासपीठावर नंदकिशोर शेगोकार, प्रा. सुनील पांडे, संजय बोरोडे, पांचोली साहेब आणि शेळके साहेब उपस्थित होते

.

प्रा.अविनाश पवार यांनी संचालन तर प्रा.गजानन वानखेडे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला डॉ,.प्रशांत कोठे, श्री राजकुमार गांधी,श्री उद्धव गणगणे, प्रा. सुरेंद्र देशमुख यांची उपस्थिती होती.