तालुक्यात दारूसह अंमली पदार्थांची विक्री जोमात,प्रशासनाची बघणाऱ्याची भूमिका पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या आदेशाची अवहेलना

0
851
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार तालुक्यात दारूसह अंमली पदार्थांची विक्री जोमात,प्रशासनाची बघणाऱ्याची भूमिका
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या आदेशाची अवहेलना

चांदुर बाजार :-

जिल्ह्यात दारूसह इतर अंमली पदार्थांची विक्री बंद असल्याचा कायदा आहे. मात्र, कायद्याला न जुमानता जिल्ह्यात दारूसह अंमली पदार्थांची विक्री जोमात सुरू असल्याचे चित्र ठिकठिकणी तयार करण्यात आलेल्या तळीरामांच्या अड्डय़ावर दिसून येत आहे. चांदुर बाजार शहरात ठिकठिकाणी दारुविक्रीसह गांजा, इतर अंमली पदार्थांचे इन्शुलीन विक्रीचा गोरखधंदा जोमात सुरु आहे. दररोज लाखो रुपयांची उलाढाल या गोरखधंद्याच्या माध्यमातून अवैधरित्या होत आहे. या गोरखधंद्याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी गडचिरोली शहरातील नागरिक करीत आहेत.

विशेष बाब म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना मोठय़ा प्रमाणात अंमली पदार्थांची विक्री गोरखधंदा चालविणार्‍या दलालांकडून करण्यात येत आहे. नगर परिषद शाळे समोर असलेल्या पशुवैद्यकीय दवाखाना च्या आत, मिरची बाजार पेठ,देशी दारू लाइन, परिसरात हे अंमली पदार्थांचा सेवन करतानाचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. जिल्ह्यातील अंमली पदार्थांची विक्री बंद असतांना हे अंमली पदार्थ नेमके येतात तरी कुठून? असा सवाल चांदुर बाजार शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिक करीत आहेत.

जिल्ह्यात दारुबंदीचा कायदा असतांनादेखील तालुक्यातील मुख्य परिसरात अवैध दारू वाहतूक करण्याच्या मध्यरात्री पर्यत मजमा दिसून येतो. याकडेदेखील लक्ष देण्याची गरज आहे. दारूबंदीचा फज्जा उडल्याचे चित्र सध्यास्थितीत चांदुर बाजार शहराततसेच ग्रामिण भागात पहावयास मिळत आहे.

एकीकडे शासन व्यसनमुक्तीकरिता जिल्ह्यात कोट्यावधी रुपये खर्च करीत आहे. मात्र, जिल्ह्यात सर्रासपणे दारुविक्री व अंमली पदार्थांंचा गोरखधंदा जोमात सुरू आहे. त्यामुळे शासनाचे व्यसनमुक्तीवर खर्च करण्यात येणारे कोट्यवधी रुपये पाण्यात बुडाल्याची ओरड नागरिक करीत आहे.तर अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यांनी अवैध धंदे वर कार्यवाही करण्याच्या आदेशाला चांदुर बाजार पोलिसांनी केराची टोपली दाखवली असल्याचे चित्र आहे.

बॉक्समध्ये
चांदुर बाजार शहरात रात्री 10 नंतर सर्व प्रतिष्ठन बंद होतात मात्र पोलिसांच्या पेट्रोलिंग मध्ये सुद्धा काही अवैध दारू ची वाहतूक करणारे हे मध्य रात्री पर्यत आपली वाहतुक राजरोस पणे चालू ठेवतात आणि काही पोलीस अधिकारी मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री करणारे याना सोडून एक दोन पेटी वाहतूक करणाऱ्या वर कार्यवाही करून आपली वाहवाह करून घेत असल्यामुळे त्याच्याकडे संशयास्पद भूमिका वाटत असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.