वसुंधरा ज्ञानपीठ मध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू शाम मिरगेच्या हस्ते ध्वजारोहण

0
674
Google search engine
Google search engine

आकोटः संतोष विणके

स्थानिक वसुंधरा ज्ञानपीठ मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी व आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल पटू शाम मिरगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वसंतराव पुंडकर अरुण सांगोळदकर सुभाष वर्मा अमोल गायकवाड विजय शिंगणे रवी पवार रोषण अकर्ते पद्माकर पांडे रामचंद्र नारे संजय धांडे अवधूत कुलट भीमराव भोयर , चौहान कोकाटे,सौ धुमाळे, सौ बुटे व मुख्याध्यापक शिवचरण नारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

ध्वजारोहणानंतर प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी आपले देशभक्तीपर विचार भाषणातुन व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन कु. श्रद्धा ढगेकर, रोहिणी पाटील तर आभार प्रदर्शन शितल नायसे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.