उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उद्या अमरावतीत ●◆● भागातील जिल्हा वार्षिक योजनांच्या आढाव्यासाठी बैठक

0
1520
Google search engine
Google search engine

नियोजन व वित्त मंत्री अजित पवार हे उद्या  मंगळवारी (28 जानेवारी) अमरावती दौ-यावर असून, त्यांच्या उपस्थितीत विभागातील पाचही जिल्ह्यांच्या वार्षिक योजनांची आढावा बैठक सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजनभवनात होणार आहे.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांचा दौरा पुढीलप्रमाणे : नागपूर येथून सकाळी 7.30 वाजता मोटारीने प्रयाण, सकाळी 9.30 वाजता नियोजनभवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे आगमन, सकाळी 10 वाजता नियोजनभवन येथे बैठक, दु. 1.15 ते 2.00 वाजता राखीव . त्यानंतर मोटारीने नागपूरकडे प्रयाण.