मोर्शी येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या कामदार कार्यालयाचे शेतकऱ्यांच्या हस्ते झाले उदघाटन

0
946
Google search engine
Google search engine

रूपेश वाळके विशेष प्रतिनिधी /

मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र महादेवराव भुयार यांना युवकांचा नेता. कष्टकऱ्यांचा आवाज. शेतकऱ्यांच्या वेदनेची नाळ. तडीपारीच्या कारवाईचा बळी. पंचायत समिती सदस्य. जिल्हा परिषद सदस्य. आणि आता आमदार. सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर येऊन लढणारा सामान्य कार्यकर्ता ते आमदार हा देवेंद्र भुयार या तरूणाचा प्रवास प्रस्थापित व्यवस्थेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. हजारो लोकांनी विश्वास टाकून आमदार देवेंद्र भुयार यांना विक्रमी मतांनी निवडून दिले आमदार देवेंद्र भुयार यांनी मतदार संघातील जनतेच्या समस्या सोडता याव्या याकरिता मोर्शी येथे
आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत कामदार कार्यालयाचे उदघाटन मोर्शी येथील शेतकऱ्यांच्या हस्ते संपन्न झाले मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी रुग्णांच्या सेवेसाठी युवकांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी येथे कामदार कार्यालय सुरू केले आहे.

मोर्शी तालुक्यातील नागरिकांसाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी , विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविन्यासाठी , जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी , रुग्णांना मदत करण्यासाठी , विद्यार्थ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी , आमदार देवेंद्र भुयार यांनी हे जनसंपर्क कार्यालय सुरू केले आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी येथिल कार्यालय हे आमदारांचे कामदार कार्यालय जनतेच्या सेवेकरिता सुरू केले असल्याचे सांगितले स्पर्धेत यश-अपयश या समांतर बाजू आहेत. जनतेत मिळून मिसळून कामे केल्यास मेहनतीचे फळ मिळते असे मत आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केले .

यावेळी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे युवा आमदार देवेंद्र भुयार  यांच्या उपस्थितीत कार्यालयाचे उदघाटन शेतकरी पंजाब गाडवे , मधुकर लेकुरवाडे , डिगंबर भामकर यांच्या हस्ते करण्यात आले असून प्रमुख अतिथी म्हणून मोहन मडघे नगरसेवक डॉ प्रदीप कुऱ्हाडे , क्रांती चौधरी , सागर ठाकरे , विनोद ढवळे , सचिन बेल , दिलीप गवई , नाना देशमुख , भोजराज घारड , विनोद ठोके , रुपेश मेश्राम , ईश्वर श्रीसाठ , हितेश साबळे , अमोल महल्ले , अतुल उमाळे , नरेंद्र जिचकार , नितीन लुंगे , विपुल हिवसे , राजेश ठाकरे , पप्पू खान , रुपेश वाळके , मनीष गुडधे , यांच्यासह शेतकरी बांधव व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .