आकोटच्या भोसलेकालीन श्री सिद्धिविनायक मंदिरात उद्या गणेश जयंती

0
880
Google search engine
Google search engine

आकोट:संतोष विणके

शहरातील सोमवार वेस फुले चौक येथील पुरातन भोसले कालीन श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर येथे उद्या दि २८ फेब्रुवारीला गणेश जयंती उत्सव हर्षोउल्हासात साजरा होणार आहे. यानिमित्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दिवसभर भरगच्च विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.

उत्सवानिमित्य सकाळी ६ वाजता जलाभिषेक, पारंपारिक पुजा व आरती होईल.नंतर मंत्रपठण,गणेश स्तुती पठण, सहस्त्रावर्तन भाविकांच्या वतीने होणार असून दुपार सत्रात भजनाचा कार्यक्रम पार पडेल.

सायंकाळी ६ वा. महाआरतीचा मुख्य कार्यक्रम उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.सोनवणे साहेब यांचे शुभहस्ते आणि ठाणेदार संतोष महल्ले सुप्रसिद्ध आर्किटेक्ट नवनित लखोटीया,व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडेल.व त्यानंतर उपस्थितांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल.

गणेश जयंती उत्सवाच्या निमित्ताने भाविक भक्तांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.