आकोटात मंदीरातील दानपेटी वर चोरट्यांचा डल्ला

0
628
Google search engine
Google search engine

आकोटः ता.प्रतिनीधी

शहरातील गजानन नगरातील संत गजानन महाराज मंदिरातील दानपेटी व नगदी रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारून पोबारा केला.ही घटना दि. २६ जानेवारीला सकाळी उघडकीस आली.
याप्रकरणी दीपक कुलकर्णी यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 380 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
चोरट्याने मंदीरातील ग्रिलचे व गेटचे कुलूप तोडुन एक लोखंडी दान पेटी व नगदी अंदाजे 500 रू चोरुन नेलेत. चोरट्यांनी मंदिरातील दानपेटींना लक्ष्य केल्याने शहरातील ईतर मंदिर व्यवस्थापनांनेही दक्ष राहण्याची गरज निर्माण झाली आहे.