अकोटच्या दिव्यांग गिर्यारोहक धिरजने सर केला प्रजासत्ताक दिनी वानरलिंगी सुळका

0
546
Google search engine
Google search engine

प्रजासत्ताक दिनी फडकविला वानरलिंगीवर तिरंगा

गिर्यारोहक धिरजची आणखी एक मोहीम फत्ते.

अकोटः-ता.प्रतिनीधी

महाराष्ट्रातील
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नानेघाटात वसलेला अतिशय अवघड असा, जमिनीपासुन सुमारे ४५० मीटर उंच असलेला वानरलिंगी सुळका अकोला जिल्ह्यातील अकोट येथील गिर्यारोहक धिरज कळसाईत यांनी अवघ्या २ तास १५ मिनिटांत २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिनी सर केला. याठिकाणी तिरंगा फडकविला, राष्ट्रगित व सलामी दिली.सर्वोच्च उंच हिमशिखर माऊंट एव्हरेस्ट मोहीमेवर जाण्याचा संकल्प धिरजने व्यक्त केला आहे।
महाराष्ट्रातील वानरलिंगी सुळका भल्या भल्या गिर्यारोहकांना आवाहन देणारा कडा आहे.जमिनीपासुन सुमारे ४५० मीटर उंच असलेला हा सुळका सरळ ९० अंश कोनात ताठ मानेने उभा आहे. या सुळक्याची गणना गिर्यारोहण क्षेत्रात अतिकठीण श्रेणीत केली जाते. त्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठीसुद्धा वांद्रे गावातून 3 तासांची अतिशय दमछाक करावी लागते.प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने, सुळक्यावर तिरंगा फडकावण्याचा मानस राखुन, धिरज आणि त्यांचे सहकारी शनिवारी २५ जानेवारी रात्री ९ च्या सुमारास पुण्याहून जुन्नरला निघाले. २६ जानेवारी सकाळी सुमारे ६ वाजता वानरलिंगी सुळका प्रस्तरोहन चालू केले. सुळक्याची ९० अंशाची ठेवण हेच याचे वैशिष्ट्य आणि त्यामुळे ही चढाई अतिशय कठीण होऊन जाते. अनेक मोहीमांचा अनुभव असलेल्या धिरजने अवघ्या २ तास १५ मिनिटांत हा सुळका सर केला.एका पायाने व हाताने दिव्यांग असून आतापर्यंत कळसूबाई शिखर, लिंगाना सुळका, कळकराई सुळका आणि खडतर असा वजीर सुळका सर केला असुन महाराष्ट्रातील विविध गड-किल्ल्यांवर यशस्वीरित्या
गिर्यारोहण केले आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर दक्षिण ऑफ्रीकेतील माऊंट किली मंजारो (उंची ५८९५)
मीटर) हे हिमशिखर २६ जानेवारी २०१९ रोजी आणि रशियातील माऊंट एलब्रुस ( उंची ५६४२ मीटर ) हे
हिमशिखर १५ ऑगस्ट २०१९ रोजी यशस्वीरित्या सर केले आहेत. त्यांची दखल घेत इंडिया व महाराष्ट्र बुकांत त्यांची नोंद झाली आहे.
धिरज कळसाईत यांच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. पंरतु गिर्यारोहण सारखे अवघड क्षेत्र जिद्द आणि चिकाटी सोबत घेऊन या तरुणाने अपंग शब्दाची व्याख्या त्याने अशी बदलून टाकली की धडधाकट माणसालाही लाजवेल असे धाडस तो सतत करीत आहे.

चौकट….
सर्वोच्च उंच हिमशिखर माऊंट एव्हरेस्ट मोहीमेवर एप्रिल २०२० मध्ये जाण्याचा संकल्प २२ वर्षीय दिव्यांग धिरज कळसाईतने केला आहे. माऊंट एव्हरेस्ट मोहीमेकरिता जवळपास ४० लाख रुपये खर्चाचा बजेट मोहीमेचे नेत्वृत्व करणाऱ्यांनी दिला आहे. (ज्यामध्ये गिर्यारोहन साहित्य, प्रवास, निवास, भोजन,
अपंग सहित्य व तत्सम खर्च आदी बाबींचा समावेश आहे.) परंतु आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने एवढा
मोठ्या खर्च झेपावणार नाही. आर्थिक क्षमता नसतांना सुध्दा तो माऊंट एव्हरेस्ट सर करण्याची
जिद्द मनाशी बाळगुण आहे. एका हाताने व पायाने अपंगत्व असतांनाही यावर्षीचा पहिला भारतीय दिव्यांग
म्हणून भारताचा तिरंगा फडकविण्याचे आपल्या सर्वांचे स्वप्न पूर्ण करुन आपल्या भारत देशाचे नाव गिर्यारोहन
क्षेत्रात सुवर्ण अक्षरात त्याला कोरावयाचे आहे. त्यामुळं मला मदत करावी अशी अपेक्षा धिरज कळसाईतने व्यक्त केली आहे. सहकार्याकरीता त्याने बँक आँफ इंडिया, शाखा अकोट अकाऊंट नंबर ९६५३१०११००१०४६७ आयएफएसी बीकेआयडी ०००९६५३ तर मोबाईल नंबर ९६८९०७८९८२ संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.