पंकजा मुंडेंना नव्हे तर आता भाजपलाच खरी पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाची गरज!

0
1347
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

ई- विदर्भ२४न्यूज

संपादकीय- विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहिर झाल्यानंतर भारतीत जनता पार्टीच्या स्वताला तैल लावणारा पैलवान समजत असणारा राज्यस्तरीय नेतृत्वाला आसमान दाखवून राजकिय खेळ्या करत राज्यात तीन पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले व शिवसेनेचे उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले.यानंतर भाजपात अंतर्गत संघर्ष तीव्र झाला.पक्षातील ओबीसी नेत्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली.यात प्रामुख्याने माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी थेट राज्याला पक्ष नेतृत्वाला आव्हान देत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आपली आगामी राजकीय वाटचाल करण्याची खूनगाठ बांधली.तसेच,27 जानेवारी एकदिवशीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे देखील जाहिर केले.यानंतर केंद्रासह राज्यातील भाजपच्या पायाखालची जमीनच सरकली.

थोड्या दिवसांच्या नंतर एकनाथ खडसे, राम शिंदे आणि चंदक्रांत पाटील यांनी देखील थेट राजाच्या नेतृत्वावर गंभीर आरोप केले.त्यामुळे,हे असेच चालू राहिले तर पक्षातील अंतर्गत संघर्ष वाढणार हे लक्षात घेऊनच भाजपच्या नवचर्चित अध्यक्षांनी पंकजा मुंडे यांना हे आंदोलन पक्षाच्या नावाखालीच करावे अशी विनंती केली.यानंतर पंकजा मुंडे यांनी तीन पक्ष एकत्रित आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात “आक्षेप नाही तर अपेक्षा आहेत” असे म्हणत औरंगाबाद येथे पहिलेच एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले.या उपोषणास अपेक्षेप्रमाणे पक्षासोबतच गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानाच्या अंतर्गत पंकजा मुंडे यांचे नेतृत्व मानणारा एक वेगळा वर्ग या उपोषणास उपस्थित होता.त्यामुळे,स्व.गोपीनाथ मुंडेंच्या प्रमाणेच विरोधी पक्षात असून देखील पंकजा मुंडे यांचे मासलिडर नेतृत्व पुन्हा एकदा सिध्द झाले.

ऐरवी सत्तेत असताना सारखे प्रसिध्दीझोतात प्रसिध्दी माध्यमांना बाईट देत असणारे सर्व नेतेमंडळी सत्ता गेल्यापासून चिडीचुप आहेत.जर एका वर्षात पुन्हा भाजपची सत्ता आली नाही तर विधानसभा निवडणुकीच्या काळात महाभरती करत भाजपात प्रवेश करणारे इतर पक्षातील काही आमदार तर आता परतीच्या मार्गावर आहेत अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत.त्यामुळे,भारतीय जनता पार्टीला महाविकास आघाडीला विरोध करण्यासाठी लोकनेतृत्व नेत्याची गरज आहे.ज्याच्या शब्दाच्या मागे भाजप पक्ष सोडून सामान्य जनतेची देखील गर्दी जमू शकेल.हाच विचार भाजपच्या पक्षश्रेष्ठीने समोर ठेवत पंकजा मुंडेंच्या पुढे आपले एक पाऊल मागे घेत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे होणारे पहिले उपोषण हे पक्षाच्या नावाखाली घेण्यास भाग पाडले असावे.त्यामुळे,आता पंकजा मुंडेंना नव्हे तर भाजपलाच मासलिडर नेतृत्व असलेल्या पंकजा मुंडे यांची गरज असल्याचे प्रामुख्याने दिसून येत आहे.यामुळे,भारतीय जनता पार्टी आता राज्यात नेतृत्वबदल करण्यासाठी अनुकूल असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.अजून याबाबतचे स्पष्ट चित्र पाच फेब्रुवारीला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या उदघाटन सोहळा पार पडल्यानंतरच होणार आहे.