गोरगरीबांची काळजी घेणा-या पक्के घर देणाऱ्या भाजपला दिल्लीत बहुमतांनी सत्तेवर आणा – पंकजाताई मुंडे

359
जाहिरात

नेरल, बादली, रिठाला येथे जाहीर सभांना प्रचंड प्रतिसाद ; पदयात्रेतून मतदारांच्या घेतल्या गाठीभेटी

नवी दिल्ली दि. ३१ —– पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोरगरीब जनतेची काळजी घेणारे नेतृत्व आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना त्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचवल्या, झोपडीपट्टी धारकांना स्वतःच्या घराचे मालक केले, त्यामुळे गोरगरीबांची खरी काळजी घेणा-या भाजपला दिल्लीत बहुमतांनी सत्तेवर आणा असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी आज ठिक ठिकाणी झालेल्या जाहीर सभेत मतदारांना केले.

पंकजाताई मुंडे सध्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौ-यावर आहेत. काल संध्याकाळी त्यांची परवेश रतन यांच्या प्रचारार्थ पटेल नगर येथे सभा झाली. आज दिवसभरात नरेला विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नील दमन खत्री यांच्या प्रचारार्थ बख्तावरपूर येथे, बादली मतदारसंघाचे उमेदवार विजयकुमार भगत यांचेकरिता स्वरूप नगर येथे, तर रिठाला मतदारसंघाचे उमेदवार मनीष चौधरी यांच्यासाठी बुध विहार येथे त्यांची सभा पार पडली. या सभांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव याठिकाणीही पहायला मिळाला. सकाळी पदयात्रेच्या माध्यमातून त्यांनी युवा व ज्येष्ठ मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचेशी संवाद साधला व भाजपा उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

ठिक ठिकाणी झालेल्या सभांना संबोधित करतांना त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष नड्डाजी व गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानुसार मी याठिकाणी प्रचारासाठी आले आहे. सामान्य, गरीब व वंचित घटकांसाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी आयुष्यभर काम केले, तेच काम पंतप्रधान मोदी करत आहेत. दिल्लीत झोपडपट्टी धारकांना त्यांच्या हक्काची घरं देण्याचे वचन त्यांनी पूर्ण केले. ४० लाख अनाधिकृत घर त्यांच्या मालकीची केली, उज्ज्वला गॅस असेल किंवा वीज पुरवठा करणारी सौभाग्य योजना असेल, अशा कितीतरी चांगल्या योजना त्यांनी यशस्वीपणे राबवल्या. नरेंद्र मोदी हे स्वतःला देशाचे पंतप्रधान नव्हे तर प्रधानसेवक मानतात, जनतेचे कल्याण करण्याबरोबरच राष्ट्रभक्तीची भावना त्यांनी जोपासली. एकीकडे मोदींसारखे कणखर नेतृत्व आपल्याला लाभले असताना दुसरीकडे आम आदमीचे नांव घेऊन सरकार चालवणा-यांनी कोणतीच वचनं पूर्ण केली नाहीत, दिल्लीतील प्रदुषण आणि गुन्हेगारी कमी करण्यात इथले सरकार अपयशी ठरले आहे, या निवडणुकीत हे झाडूवाले सरकार दूर सारून गरीबांचे हित पाहणा-या भाजपच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।