वडाळी सटवाई येथे संत वासुदेव महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापनदिन महोत्सव

0
781

 


अकोटः संतोष विणके

येथुन जवळच असलेल्या श्री संत वासुदेवजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या पवित्र अश्या वैष्णव ज्ञान मंदीर वडाळी सटवाई येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मुर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन महोत्सव निमीत्य दि. ३१/०१/२०२० ते ०७/०२/२०२० पर्यत ग्रंथ साम्राज्ञी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा अखंड हरिनामसंकिर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री ह.भ.प.सुरेश महाराज मानकर (शास्ञी), श्री ह.भ.प.शाम महाराज पुरी, श्री ह.भ.प.सुदाम महाराज आगरकर, यांचे कडे पारायण व्यासपिठ राहणार असुन या हरिनाम सप्ताह दरम्यान संस्थेचे महाराज मंडळी
मार्गदर्शकॽ- श्री ह.भ.प.नागोराव महाराज चौखंडे,श्री ह.भ.प.मोहन महाराज रेळे, श्री ह.भ.प.अवधुत महाराज थोरवे, श्री ह.भ.प.मंगेश महाराज ठाकरे,यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
प्रवचनकार:- सप्ताहादरम्यान श्री ह.भ.प.विठ्ठल महाराज इंगळे, श्री.ह.भ.प.हरिभाऊ महाराज साबळे, श्री.ह.भ.प.अतुल महाराज बोरडे, श्री.ह.भ.प.आत्माराम महाराज वाकोडे, श्री.ह.भ.प.उमेश महाराज मोहोकार, श्री.ह.भ.प.मोहन महाराज रेळे, श्री.ह.भ.प.मंगेश महाराज ठाकरे, यांचे प्रवचने होऊन दररोज सायंकाळी हरिपाठ व रात्रि हरिकिर्तन ८ वा.
दिनांक:-३१/०१/२०२०
श्री ह.भ.प.विठ्ठल महाराज झाडोकार,(पातुर्डा)
दिनांक:-०१/०२/२०२०
श्री ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज वाघ,( ज्ञानेश आश्रम संस्था वारी भैरवगड)
दिनांक:-०२/०२/२०२०
श्री ह.भ.प.श्रीहरी महाराज सोनेकर,(येवदा)
दिनांक:-०३/०२/२०२०
श्री ह.भ.प.शरद महाराज पाटील,(लेहगाव)
दिनांक:-०४/०२/२०२०
श्री ह.भ.प.सारंगधर महाराज,(गाळेगावकर)
दिनांक:-०५/०२/२०२०
श्री ह.भ.प.गजानन महाराज रोडे,(कापुसतळणी)
दिनांक:-०६/०२/२०२०
श्री ह.भ.प.प्रकाश महाराज नेवारे,(हरम) यांचे हरिकिर्तन होतील. तसेच शुक्रवार दिनांक:-०७/फेब्रुवारी/२०२० ला शेकडो भाविक भक्तांच्या उपस्थितित श्री ह.भ.प.अशोक महाराज जायले यांचे काल्याचे किर्तन होऊन दुपारी ०१ते ०४ वाजेपर्यत महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल.


उपरोक्त सप्ताहाचे आयोजन श्री संत वासुदेवजी महाराज यांच्या प्रेरणेने स्थापित श्री संत भास्कर महाराज आदर्श सर्वागीण बाल विकास सुसंस्कार चँरीट्रेबल ट्रस्ट र.नं.ई.५२९ अकोली (जहाँगीर),ता. अकोट,जि.अकोला, द्वारा करण्यात येत असुन ह्या सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे व ह्या वर्धापन दिनोत्सव सोहळ्यास उपस्थित राहुन तन-मन-धनाने सहकार्य करावे असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री ह.भ.प.अशोक महाराज जायले यांनी कळविले आहे.