कृषी क्षेत्रासह महिला सक्षमीकरण व ग्राम विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प :खा.डॉ.प्रितमताई मुंडे

0
1216
Google search engine
Google search engine

दिल्ली.दि.०१—-केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत भारत सरकारचा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला.हा अर्थ संकल्प कृषी क्षेत्रासह,महिला सक्षमीकरण व ग्रामीण विकासाला चालना देणारा सर्वव्यापी,सर्वसमावेशक अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी दिली आहे.

या अर्थ संकल्पामध्ये महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या तरतुदी महिलांना आर्थिक मजबुती मिळवून देणाऱ्या आहे.बचत गटांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी केंद्र सरकार प्राधान्य देणार असून महिला बचत गटांन मार्फत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी करण्यात आलेल्या तरतुदी या अर्थ संकल्पाच्या प्रमुख आकर्षण आहेत.तसेच हवामान नियंत्रणासाठी चार हजार कोटी रुपयांची तरतूद करून केंद्र सरकारने नाविन्यपूर्ण विषय सुद्धा हाताळला आहे असे खा.प्रितमताई मुंडे यांनी म्हंटले आहे.

आपल्या कृषीप्रधान देशातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शेतीमध्ये सौर ऊर्जेची निर्मिती करण्यावर भर देण्यात आला असून शेतामध्ये निर्मित होणारी सौर ऊर्जा शेतकऱ्यांना स्थानिक ग्रेड मध्ये विकता येईल व त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळेल यासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात विशेष तरतूद केली आहे.ग्राम विकासाला चालना देण्याऱ्या तरतुदी अर्थसंकल्पात करण्यात आल्या असून शिक्षण आरोग्य,रोजगार निर्मिती सारख्या मूलभूत गरजांना अर्थसंकल्पात प्राधान्य दिले आहे. कृषी,महिला सक्षमीकरण,ग्रामीण विकास केंद्रस्थानी ठेवून करण्यात आलेल्या तरतुदी निश्चितच आनंददायी असून नवभारताच्या निर्मितीमध्ये पूरक व महत्वपूर्ण ठरणारा अर्थसंकल्प असल्याचे म्हणत खा.प्रितमताई मुंडे यांनी केंद्र सरकारचे आभार व्यक्त केले.