शेतीच्या पाण्यासाठी अजुन किती आंदोलने करावी लागणार? शेतकऱ्यांना आंदोलनाशिवाय कधी मिळणार हक्काचे पाणी टेंभुच्या पाण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते डी.एस.देशमुख यांचे हल्लाबोळ आंदोलनाचा इशारा!!

0
1133
Google search engine
Google search engine


सांगली/ कडेगांव
कडेगाव तालुक्यातील टेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात पाण्याअभावी शेतकऱ्यांचे रब्बीत पिकासह अन्य पिके वाळून जाण्याच्या मार्गावर आहेत शेकऱ्यांनी पै,पै साठवुन शेतात पिके लावली आणि पाण्या अभावी सुकु लागली त्या शेतकऱ्यांना व पिकांना जीवदान देण्याकरीता तरी टेंभु उपसा जलसिंचन योजनेचे तात्काळ आवर्तन चालु करावे असा सर्वसामान्य शेतकरी आक्रोश फोडत आहेत .अन्यथा कडेपुर (ता.कडेगांव) येथिल टेंभु योजनेच्या कार्यालयावर हल्लाबोल आंदोलनाचा इशारा कडेगांव चे सामाजिक कार्यकर्ते डी.एस.देशमुख यांनी प्रांताधिकारी गणेश मरकड यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

टेंभु उपसा जलसिंचन योजनेचे एकही आवर्तन सोडले नाही.ज्या शेतकऱ्यांची विहीर नाही अथवा कोणतेही शासकीय पाईप लाईन नाही.ते शेतकरी टेंभुच्या आवर्तनाची वाट बघत आहेत.त्यांची पिके पाण्या अभावी सुकु लागली आहेत.टेंभुचे संबंधीत अधिकाऱ्यांना फोनद्वारे तसेच कार्यालयात भेटुन आवर्तन कधी चालु होणार याबाबत चौकशी केली असता आज,उद्या, आठवड्यात, महीन्यात आवर्तन चालु होईल अशी टोलवाटोलवीची उत्तरे दिली जातात शेतकऱ्यांना जेवढी आवर्तने देणे आवश्यक आहे तेवढी न देताच आवर्तनाची पाणीपट्टी मात्र पुर्ण वसुल केली जाते ही प्रशासनाची लोकशाही नसुन शेतकऱ्यांच्यावर लादलेली हुकुमशाही आहे.जानेवारी महीना संपत आला तरी टेभु योजनेचे एकही आवर्तन सोडले नाही.जर लवकरात लवकर आवर्तन टेंभु योजनेच्या अधिकाऱ्यांनी सोडले नाही तर आम्ही टेंभु योजनेच्या कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करणार असल्याचेही डी एस देशमुख यांनी निवेदनात म्हटले आहे.प्रांताधिकारी यांना निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते डी.एस.देशमुख यांचेसह शांताराम दिक्षित, राजाराम माळी,दिपक शेडगे,संजय तडसरे,अनिल देसाई,अभिमन्यु वरूडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.