पालकमंत्री ना.बच्चू कडू यांनी घेतला विविध विभागाचा आढावा · शहरासाठी जीगाव धरणातून पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव करा

0
1221
Google search engine
Google search engine

पालकमंत्री ना.बच्चू कडू यांनी घेतला विविध विभागाचा आढावा

· शहरासाठी जीगाव धरणातून पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव करा

· बीओटी तत्वांवर अत्याधुनिक शहिद स्मारक तयार करणार

· मंगेश शिष्यवृत्ती योजनेतंर्गत निराधार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार

· संदुर बोलक्या शाळा प्रायोगिक तत्वावर 10 आदर्श शाळा तयार करणार

· सर्व विद्यार्थ्यांना शाळेतच जातीचे दाखले

· अपंग प्रमाणपत्रासाठी अभियान राबविणार

· सामान्य रूग्णालयाची नविन इमारतीसाठी प्रस्ताव

· प्रायोगिक तत्वावर आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र तयार करणार

अकोला,दि. 2 – राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग,सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग,विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, महिला व बालविकास,शालेय शिक्षण व कामगार कल्याण राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी शिक्ष्ण विभाग, आरोग्य विभाग, शहिद स्मारक निराधारसाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या मंगेश योजना, सावकारी कर्ज प्रकरणे तसेच मायक्रो फायनान्स तसेच आदी विभागाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभाताई भोजणे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर , मनपा आयुक्त संजय कापडणिस, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षणाचा स्तर तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी सुंदर शाळा, बोलक्या शाळा ही संकल्पना राबविण्यात येणार असून प्रायोगिक तत्वावर सारकिन्नी, चतारी, शिवर,उमरा, शहापुर, अनभोरा, गायगाव, माळेगाव बाजार, हिवरखेड उर्दु शाळा, भांबेरी या दहा आदर्श शाळा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी सांगितले. मंगेश शिष्यवृत्ती येाजनेतुन जिल्ह्यातील निराधार कुटूंब ,अपंग व गरजू कुटूंबातील 2470 विद्यार्थ्यांना मार्च अखेर पर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. शाळेच्या खोल्यांची दुरूस्ती, शिष्यवृत्ती याबाबत आढावा घेतला.

अपंग निर्मुलन कल्याण योजनेतंर्गत आतापर्यंत युडीआयडी दिव्यांग प्रमाणपत्र 7123 देण्यात आले आहे. प्रलंबीत 3723 व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष अभियान राबविण्याबाबत निर्देश यावेळी पालकमंत्री यांनी आरोग्य विभागाला दिले. आजारी व किशोर अवस्थेतील मुलींच्या समस्या कुपोषण निर्मुलन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

भविष्यात शहरात निर्माण होणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी जिगांव धरणातून पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव महानगर पालिकेने तसेच संबंधीत विभागाने त्वरीत करावा असे निर्देश पालकमंत्री यांनी दिलेत.

मोर्णा नदीच्या काठावर लक्झरी बसस्थानकाजवळील जागेवर अत्याधुनिक व सुंदर असे शहीद स्मारक बांधा, वापरा व हस्तांतरीत करा (बीओटी) या तत्वावर बांधण्याबाबतचा प्रस्ताव त्वरीत तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी दिलेत.सावकारी कर्ज प्रकरणे , मायक्रो फायनान्स कंपनी याबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे गिरीष जोशी , कार्यकारी अभियंता सुधिर धिवरे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, उपसंचालक आरोग्य सेवा, डॉ. अहमद फारूकी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रकाश मुकूंद , उप शिक्षणाधिकारी प्राथमिक दिलीप तायडे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अमोल यावलीकर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रविण लोखंडे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार , रामदास सिद्धभट्टी , रमेश पवार, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर यांची उपस्थिती होती.