गाव तक्रार मुक्त करायचे आहे,मात्र अपेक्षा डोंगर खूप मोठा आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली खंत, अधिकारी यांची देखील यांचे सहकार्य आवश्यक

0
806
Google search engine
Google search engine

गाव तक्रार मुक्त करायचे आहे,मात्र अपेक्षा डोंगर खूप मोठा आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली खंत, अधिकारी यांची देखील यांचे सहकार्य आवश्यक

चांदुर बाजार :-/प्रतिनिधी

सर्वसामान्य नागरिकांची महसूल व अन्य शासकीय विभागाशी निगडीत कामे वेळेत पूर्ण व्हावी, जलसंपदा, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून राहुटी उपक्रम जिल्ह्यात विविध गावांत राबविण्यात येत आहे. संपूर्ण राज्यात हा पहिला उपक्रम सेवा हमी कायद्यांतर्गत राबविण्यात येत असून, आज चांदूर बाजार तालुक्यातील कुरळ पूर्णा व त्यानंतर हिरुळ पूर्णा येथे आयोजित राहुटी उपक्रमाचा तालुक्यातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.
या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी किंवा निवेदने स्वीकारून त्या तत्काळ निकाली काढण्यात येत आहेत. यावेळी राज्यमंत्री श्री. कडू यांनी स्वत: शिबिरात उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या तत्काळ निपटा-याबाबत अधिका-यांना निर्देश दिले. सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे राज्यमंत्री श्री. कडू यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अनेक नागरिकांना शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र यासह विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. पावसामुळे घर पडझड झालेल्या नागरिकांना मदतीचे वाटप व अपंग नागरिकांना सायकल, स्टिक आदी साहित्याचे वाटपही यावेळी करण्यात आले.

प्रतिक्रिया :-
जनतेच्या अपेक्षा या न संपणाऱ्या आहे.अधिकारी वर्ग या ठिकाणी त्यांचे काम लगेच करून देत आहे मात्र लाभार्थी यांनी त्यांना धन्यवाद सुद्धा म्हणून नये का?तसेच निवडणूक वेळी प्रतिस्पर्धी यांनी सुद्धा या प्रकारचे कार्यक्रम घेण्यास काय हरकत आहे असाही ट्रोल त्यांनी यावेळी लावला तर प्रत्येक गाव हे तक्रार मुक्त करायचे असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.