येवदा येथे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि करियर गाईडन्स या विषयावर व्याख्यान संपन्न.

474
जाहिरात

आकोटःता.प्रतीनीधी

जनविकास शिक्षण संस्था येवदा येथे राष्ट्रीय सेवा योजना तर्फे नेहरू युवा केंद्र अमरावती द्वारा प्रा. प्रवीण बोंद्रे यांच्या पर्सनॅलिटी डेवलपमेंट आणि करियर गाईडन्स या विषयावर 1 फेब्रुवारी 2020 ला व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
दुसऱ्यावर प्रभाव टाकण्याकरिता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अतिशय आवश्यक आहे. अंतर्गत आणि बाह्यगत असे पर्सनॅलिटीचे दोन प्रकार पडतात. आपली केशरचना, वेशभूषा, आपले बोलणे, आपली वर्तणूक, ह्या बाह्य पर्सनॅलिटी मध्ये येतात.


अंतर्गत पर्सनॅलिटीमध्ये आपल्यामध्ये लपलेले कलागुण विकसित करणे हे महत्त्वाचे ठरते. असे मोलाचे मार्गदर्शन प्रा. प्रवीण बोंद्रे यांनी या व्याख्यानाच्या निमित्ताने केले.
प्रा. प्रवीण बोंद्रे यांनी बीए, बीकॉम च्या विद्यार्थ्यांना करियर गाईडन्स या विषयावर मार्गदर्शन करतांना अर्थशास्त्र या विषयातून कशापद्धतीने विश्वबँक, आय. एम. एफ., वित्तमंत्री, रिझर्व बँक गव्हर्नर ही पदे प्राप्त होऊ शकतात. तसेच राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास करून कशाप्रकारे लीडरशिप करता येऊ शकते, तसेच सीएस, एमपीएससी, यूपीएससी, स्टाफ सिलेक्शन कमिशन, प्रोफेशनल आर्ट्स, सायबर सिक्युरिटी, वेब डिझाईनिंग या क्षेत्रात कशाप्रकारे रोजगार उपलब्ध होऊ शकतो. यासंदर्भात मार्गदर्शन केले.
तसेच अनुशासन आणि अभ्यास कसा करावा ? या विषयावर सुद्धा प्रा. प्रवीण बोंद्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला जिल्हा युवा समन्वयक आणि नेहरू युवा केंद्र अमरावती यांच्याद्वारे स्नेहल बासुदकर मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना नेहरू युवा केंद्र यासंदर्भात त्याच्या कार्याबद्दल माहिती दिली.
या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. वाय. जे. सिंग सर, माजी विद्यार्थी समिती समन्वयक डॉ. अतुल टेवरे सर, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. संदीप डोंगरे सर यांची विशेष उपस्थिती होती. तसेच जनसेवा शिक्षण संस्थेतील सर्व प्राध्यापक मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।