दहा पिढ्यांच्या विस्ताराचे जकाते कुटुंबियांचे स्नेहमिलन

0
1137
Google search engine
Google search engine

आकोटःसंतोष विणके

जकाते कुटुंबाच्या स्नेह संमेलनाचा सोहळा आकोला येथील उत्सव मंगल कार्यालय जठार पेठ येथे दि.२६ व २७जानेवारी २०२०रोजी संपन्न झाला.आपल्या कुटुंबातील लहानथोर व्यक्तींना एकत्र  आणण्यासाठी स्नेह संमेलन आयोजन करण्यात आले होते. जकाते परिवारात ९० वर्षे नंतर प्रथमच स्नेह संमेलन होत आहे.खऱ्या नात्याची गरज प्रत्येकाला आहे. कारण एकंदर बाहेरच्या वातावरणाने प्रत्येक जण होरपळून निघाला आहे.रक्ताच्या नात्यात परस्परांना बांधून ठेवण्याची ताकद असते आणि याच ताकदीने प्रत्येक कुटुंबातील नाळ घट्ट करून घेते असे मनोगत जकाते परिवारातील जेष्ठ मार्गदर्शक मा.सुधाकरराव जकाते यांनी समारोप भाषणातून बोलताना व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरुवात दि.२६जानेवारी ला सुरुवात झाली. जकाते परिवारातील जेष्ठ श्री.कृष्णराव शंकरराव जकाते, गोविंदराव विनायकराव जकाते , सुधाकरराव शंकरराव जकाते,  मधुकरराव देविदास जकाते, दिवाकर देविदास जकाते ,विनायक पुरुषोत्तम जकाते,वसंत विष्णूपंत जकाते यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाला  ४०कुटुंबातील १००जण सहभागी झाले होते.स्नेह संमेलनात परिवाराती गाण्याचा कार्यक्रम, नृत्ये संगीत, कला, महिलासाठी उखाणे स्पर्धा, कुटुंबातील प्रमुख व्यक्तीने कुटुंबातील माहिती दिली. मुले, नातवंडे, जावाई,सुना यांची ओळख,करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने असे दिसून आले की, जकाते परिवारातील आय.टी क्षेत्रात कार्यरत, उच्चशिक्षित, एम फिल,पीएच डी,कला क्षेत्रात प्रावीण्य, असे विविध क्षेत्रात कार्यरत आहे. स्वतः व्यवसाय करित सामाजिक क्षेत्रात सहभागी झाले आहे हे दिसून आले.

जकाते परिवार स्नेह संमेलन २०२०स्मरणिका काढण्यात आली. त्याचे सुध्दा विमोचन परिवारातील जेष्ठ व्यक्तीच्या हाताने करण्यात आल. कुलस्वामिनी आई एकविरा देवी (मुऱ्हा)  रुद्र अभिषेक करण्यात आला.

स्मणिकात आशिर्वचन प.पू.श्री जितेंद्रनाथ महाराज श्रीक्षेत्र सुर्जी अंजनगाव, हभप श्रीराम गंदाधर शास्त्री आकोला, मानव संसाधन मंत्री केन्दीय मंत्री खा.संजयराव धोत्रे,आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आकोला महानगर संघचालक गोपालजी खंडेलवाल, आमदार रणजीत पाटील,श्रीकांत कोरान्ने यांनी शुभेच्छा पत्र देऊन जकाते परिवार आपले प्रेम व्यक्त केले.

जकाते परिवारातील जेष्ठ आईवडिलांचा सत्कार घेण्यात आला यामध्ये श्री.कृष्णराव जकाते व सौ सुमन जकाते, गोविंदराव जकाते व सौ निर्मला जकाते, सुधाकरराव जकाते व सौ. सुचेता जकाते ,मधुकरराव जकाते व सुधा जकाते ,दिवाकर जकाते व सौ.वैशाली जकाते, विनायक जकाते व सौ सरला जकाते यांचा पेशवे पगडी, व ओटी भरून सत्कार करण्यात आला.

जेष्ठ मार्गदर्शक सुधाकरराव जकाते यांनी आपले विचार व्यक्त करतांना जकाते कुटुंबातील सदस्य एकमेकांना धरुन राहिले पाहिजेत, आपण आपला विस्तार पहावा या हेतुने या स्नेह संमेलन घेण्यात आले होते.ह्या एकतेचा परिणाम वंशातील, संसारातील तसेच राष्ट्रीय एकतेला बळकटी प्रयत्न होतो. असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम जकाते, मंगेश जकाते, विनय जकाते,सौ.मैत्रेयी जकाते ,सौ.वैशाली ठाकूरव्दारकर सौ.गौरी जकाते यांनी केले होते. कार्यक्रमाचे आभार महेश जकाते यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रविंद्र जकाते, वामन जकाते, मंगेश जकाते, विनोद जकाते अनिल जकाते, विवेक जकाते, गणेश जकाते,अविनाश जकाते, वसंतराव जकाते, विनायक जकाते, सौ.रसिका जकाते, सौ,वैदेही जकाते, सौ.मैत्रेयी जकाते, सौ.गौरी जकाते,यांनी प्रयत्न केले.