माऊली अनुराधा देवी इंग्लिश स्कूल चे 10 वे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

0
714

चिमुकल्यांचा आनंदोत्सव मोबाईल चा दुष्परिणाम दर्शविणारे नाटक आकर्षक

ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी यांचा विशेष सन्मान

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

दि.- ०४- परळी वै परळी शहरातील समतानगर पंचक्रोशीत माऊली अनुराधा देवी प्रायमरी इंग्लिश स्कूलचे भव्य वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले यामुळे परळी परिसरात एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मोबाईलचा मोबाईलचा अतिवापर किती हानिकारक आहे हे दर्शवणारे नाटक सर्वांची दाद मिळवून गेले.

थोडक्यात परळी शहरातील समता नगर परिसरात माऊली अनुराधा देवी प्रायमरी इंग्लिश स्कूल मध्ये सीबीएससी अभ्यासक्रम शिकवला जातो या शाळेस आज दहा वर्षे पूर्ण होत आहेत गुणवंत विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न केला जातो सर्व शिक्षक हे विशेष प्रशिक्षण दिलेले आहेत आणि आज ही शाळा परळी परिसरामध्ये इंग्लिश स्कूल च्या रूपाने नावलौकिकास प्राप्त होत आहे.

अशा या माऊली अनुराधा देवी इंग्लिश स्कूलचे दहावी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मा. श्री. अजयजी मुंडे होते तर उद्घाटक म्हणून माजी नगराध्यक्ष मा. श्री वाल्मीक आन्ना कराड होते तर प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा. श्री बाबुरावजी मुंडे माननीय वसंतरावजी मुंडे, वनरक्षक अधिकारी श्री अमोल मुंडे, ॲड. हरिभाऊ गुट्टे हे होते या कार्यक्रमास उपस्थित विशेष उपस्थिती मा.श्री. भैया धर्माधिकारी, ज्येष्ठ पत्रकार श्री प्रशांत जोशी, नायब तहसीलदार सौ. डॉ. क्षीतिजा वाघमारे मॅडम, मेस्टा चे जिल्हाध्यक्ष श्री अनिल जाधव, प्राचार्य अश्विनी मुंडे यांची उपस्थिती लाभली. यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचे आयोजक श्री सुरेश गीते, श्री शैलेश मुंडे, श्री अंबाजी मुंडे श्री सुमित मुंडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार आणि माऊली अनुराधा देवी इंग्लिश स्कूलचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.

ज्येष्ठ पत्रकार श्री प्रशांत जोशी यांचा विशेष सन्मान

परळी शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्री प्रशांत जोशी यांना पत्रकारिता भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आल्या असल्याने औचित्य साधून त्यांना माऊली अनुराधा देवी इंग्लिश स्कूलच्या वतीने विशेष स्मृतिचिन्ह देऊन श्री वाल्मिक आण्णा कराड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

परळी परिसरातील नागरिकांमध्ये कलागुण पाहून आनंदाचे वातावरण

या वार्षिक स्नेहसंमेलनात सर्वच लहान-मोठ्या चिमुकल्यांनी आपल्या आतील गुणांची दर्शन प्रेक्षकांना घडवले यात मोबाईलचा अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम किती हानिकारक आहेत हे दर्शवणारे नाटक कार्यक्रमाचे आकर्षण ठरले त्याचबरोबर लावणी, वकृत्व, नाटक, लोकगीत, एक एकांगी नृत्य एक अंकी नाटक विद्यार्थ्यांनी सादर केली या सर्वच भरभरून प्रतिसाद दिला प्रतिसाद दिला.