कडेगाव तालुक्यात वन वनवा प्रतिबंध सप्ताह सुरू : वन विभागाचा उपक्रम : वनपरिक्षेत्रात आग न लावण्याचे आवाहन

जाहिरात

सांगली/कडेगाव : सांगली जिल्ह्यातील
कडेगाव-पलूस वन परिक्षेत्रामध्ये वन वनवा प्रतिबंध सप्ताह साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली.
१ ते ७ फेब्रुवारी दरम्यान वन विभाग मार्फत वनवनवा प्रतिबंधक सप्ताह दरवर्षी साजरा केला जात आहे. या कार्यक्रमा अंतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिक, शालेय विद्यार्थ्यांना वनांचे, वन्यजीवांचे महत्त्व पटवून देऊन, वन वनव्यास प्रतिबंध करण्या विषयी प्रबोधन व जनजागृती केली. वन वनव्यामुळे अनमोल अशी वन व वन्यजीव संपदा तसेच विकसित झालेल्या वन परिसंस्था यांची अपरिमित हानी होते. सरपटणारे प्राणी, पक्षी त्यांची आश्रयस्थान, अंडी या वन वनव्या मध्ये होरपळून निघतात .
तरी सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते, की आपल्या निष्काळजीपणे शेताचा बांध पेटवून किंवा उसाचे फड पेटवणे अशा क्रुत्यांमुळे आपल्या शेताला लागून असलेले वनक्षेत्र पेटणार नाही, याची आपण दक्षता घ्यावी. तसेच वन वनव्याची एखादी घटना आपल्या निदर्शनास आल्यास वनपरिक्षेत्र कडेगाव- पलूस कार्यालयास कल्पना देण्यात यावी. असे आवाहन नागरिक व प्रत्येक गावातील ग्रामवन समितींना करण्यात येत आहे. वनवनवा विझवण्यासाठी वनविभागाला सहकार्य करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. असे आवाहन वनक्षेपाल मदन क्षीरसागर यांनी केले आहे.
वनपाल एस आर ठोंबरे, वनपाल आर आर पाटील, एम ए ढेरे, राजेंद्र मोहिते, कृष्णत मोकळे, यांच्यासह वनरक्षक व वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।