उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या झाल्यास ३०२ दाखल करण्याची मनसेची मागणी

146
जाहिरात

उस्मानाबाद/प्रतिनिधी

आता उस्मानाबाद जिल्ह्यात जर शेतकर्याने आत्महत्या केली तर विमा कंपनीला जबाबदार धरुन मरणास कारणीभुत कंपनीलाच धरावे व संबंधीतावर ३०२ चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी उस्मानाबाद जिल्हाधीकारी यांना मनसेने निवेदन देऊन केली आहे.
जिल्हयात सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले असताना ही, उस्मानाबाद जिल्हयाला सोयाबीन पिकविम्यातुन वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत अडकला आहे. शेतक-यांना त्याच्या हक्काचा सोयाबीन पीकविमा तत्काल वितरीत करावा या मांगणीचे निवेदन मनसेच्या वतीने जिल्हाधिका-यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्हयात सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे हे प्रत्यक्षात राज्यपालांनी मान्य करत शेतक-यांना मदतीचा हाथ दिला होता, परंतू पिकविमा कंपन्यांनी पिकविता धुडकावला आहे । जिल्हयात सुमारे ४२ कोटी रूपयाचा हप्ता शेतक-यांनी भरला होता. यामध्ये ३५ कोटी रूपये सोयाबीन पीकाचे भरले होते. मात्र मुग व उडीद पिकासाठी विमा नगण्य देवून कंपनीने शेतक-यांचे आर्थिक शोषण करून सोयाबीन पिकविमा नाकारला आहे. सोयाबीन उत्पादक शेतक-यांनी जर आत्महत्या केली तर पिकविमा कंपन्यावर ३०२ चा गुन्हा नोंद करण्याची मागणी यावेळी मनसेच्या वतीने करण्यात आली. जर शेतक-यांना पिकविमा प्राप्त नाही झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याची चेतावणी यावेळी देण्यात आली आहे. निवेदनावर राजेंद्र गपाट, महिला आघाडीच्या खळखट्याक फेम वैशाली गायकवाड, दत्ता बोंदर, शब्बीर शेख, मिलिद चांडगे, रोहिदास मारकड, संजय पवार, दत्ता मोरे, संजय कोळी, सागर बारकुल, विलास बंडगर, सुशांत टोणगे, अरबाज शेख, निलेश जाधव, कुणाल महाजन, सौरभ अभंग, अभिजीत कांबळे आदीच्या स्वाक्ष-या आहेत.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।