आकोटात सीएए समर्थनार्थ ९ फेब्रुवारीला रॅली

212
जाहिरात

 

रॕलीची जय्यत तयारी सुरु

अकोटःता.प्रतिनिधी

राष्ट्रीय सुरक्षा मंच आकोट च्या वतीने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ ९ फेब्रुवारी रोजी भव्यदिव्य रॅली काढण्यात येणार आहे.
या संदर्भात ४ फेब्रुवारी रोजी स्थानिक कबुतरी मैदान येथील सभागृहात नियोजन सभा पार पडली. यावेळी रॅली व सभे विषयी प्रमुख उपस्थितांनी मार्गदर्शन करुन चर्चा केली.
अकोट शहरात ९ फेब्रुवारी रोजी दु. ३ वाजता सी.ए.ए.समर्थनार्थ रॅली व सभा पार पडणार सदर रॅली ही नेहरु पार्क बस स्टॅन्ड समोरुन प्रारंभ होऊन शिवाजी महाराज चौक, जयस्तंभ चौक, सोनू चौक, याकूब पटेल चौक, यात्रा चौक मार्गे नरसिंग महाराज मंदिर पटांगण येथे पोचून रॅलीचा समारोप होईल.

त्यानंतर शिष्टमंडळाव्दारे सी.ए.ए.समर्थनार्थ उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात येईल. तरी सी.ए.ए.समर्थक राष्ट्रप्रेमी नागरिकांनी हजारोच्या संख्येने रॅली व सभेत सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रीय सुरक्षा मंच अकोट यांनी केले आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।