श्री गजानन महाराज (विहीर)संस्थान शांतीवन अमृततीर्थ येथे प्रगट दिन महोत्सव

644

 

आंतरराष्ट्रीय कथावाचक स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराजांचा कथा सत्संग

विजय ग्रंथ पारायण, कीर्तन सप्ताहासह विविध कार्यक्रम

अकोटःप्रतिनिधी

सातपुड्याच्या पायथ्याशी असणारे पोपटखेड जवळील संत श्री गजानन महाराज विहीर संस्थान शांतीवन अमृत तीर्थ अकोली जहागीर – अकोलखेड येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य प्रगट दिन महोत्सवाचे आयोजन दि.८फेब्रु ते१४ फेब्रु दरम्यान करण्यात आले आहे. प्रकट दिन महोत्सवानिमित्त भागवत कथा तथा कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञात यंदा आंतरराष्ट्रीय कथा वाचक तपोनिष्ठ श्री स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या सुमधुर वाणीतुन कथा श्रवणाचा लाभ श्रोत्यांना घेता येणार आहे.

 

कथेला मुख्य यजमान कैलाशचन्द्र अग्रवाल व सौ. कुमुदिनी कैलाशचंद्र अग्रवाल लाभणार आहेत.श्री गोविंद देवगिरीजी महाराज यांनी आज पर्यंत विविध भाषांमध्ये इंग्लंड,अमेरिका, कॅनडा,ऑस्ट्रेलिया,सिंगापूर,थायलंड आदी विविध देशांमध्ये १५०० कथा वाचन केले आहे.अकोट तालुक्यातील जनतेला त्यांच्या सुमधुर वाणीतून कथा श्रवणाची अमुल्य संधी प्राप्त होणार आहे.प्रकटदिन महोत्सवानिमित्त विजय ग्रंथ पारायण हरिनाम कीर्तन सप्ताह तसेच दररोज स. ६ वाजता काकडा,स.८ ते १० सामूहिक विजयग्रंथ पारायण स.११ ते १ भोजन प्रसाद दु.१ ते ५ श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ संध्या.५ वा. हरिपाठ रात्री ७ ते ९ हरिनाम कीर्तन पार पडणार आहे. तर दैनंदिन कीर्तनाच्या कार्यक्रमांमध्ये दि. ८फेब्रु हभप विनोद महाराज पंचगव्हाणकर ,दि.९ हभप निवृत्ती महाराज तराळे( भागवताचार्य) दि.१० हभप गणेश महाराज शेटे (भागवताचार्य) झी टॉकीज फेम दि.११ हभप मोहन महाराज मेतकर (भागवताचार्य) दूरदर्शन कीर्तनकार दि.१२ हभप अच्युत महाराज बोरोडे( भागवताचार्य) दि.१३ हभप सुभाष महाराज काळे( रामायणाचार्य) दिनांक १४ हभप गणेश महाराज लोखंडे यांची कीर्तन सेवा लाभणार आहे तर दि.१५ रोजी सकाळी ८ ते १० ते श्रींच्या पादुका व मुखवट्याची नगर प्रदक्षिणा त्यानंतर हभप विठ्ठल महाराज साबळे यांचे काल्याचे किर्तन पार पडणार आहे.

महोत्सवानिमित्त दररोज कथा स्थळी भव्य महाप्रसाद वितरण तथा दि.१० ला ५६ भोग नैवेद्य दि.१३ रक्तदान शिबिर आधी कार्यक्रम पार पडणार आहेत. सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या निसर्गरम्य अध्यात्मिक ऊर्जा असणारे शांतीवन अमृततीर्थ हे श्रींच्या प्रकट दिन महोत्सवासाठी येणाऱ्या हजारो भक्तांच्या आनंद सागरास सज्ज झाले आहे. भाविकांनी या महोत्सवात सहभागी होण्याचे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात