युवा लेखकांनी चित्रपटलेखनाकडे वळावे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निशांत धापसे यांचे प्रतिपादन

0
652
Google search engine
Google search engine

युवा लेखकांनी चित्रपटलेखनाकडे वळावे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निशांत धापसे यांचे प्रतिपादन·

अकोला-(दि.५ फेब्रुवारी;२०२०)

एका लग्नसमारंभाच्या निमित्ताने अकोल्यात आलेल्या भोंगा या मराठी चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लेखक निशांत धापसे यांनी एका पत्रकार परिषदेत बोलतांना वरील प्रतिपादन केले.
सिनेसृष्टी या मायानगरीचे आकर्षण प्रत्येकालाचं असते प्रत्येक जण आपलं नशीब त्या ठिकाणी आजमावुन पाहतं सर्वचं यांत यशस्वी होतातचं असं नाही पण सिनेमाची कुठलाही पार्श्वभूमी नसतांना स्वत: च्या प्रचंड मेहनतीच्या भरवशावर आपलं स्थान निर्माण करणारे फार कमी लोक असतात त्यात चं आपलं स्थान आपल्या सकस लिखानाच्या भरवशावर निर्माण केलं ते नांव आहे निशांत धापसे
या युवा लेखकाने एकून ७ चित्रपटांत लेखन केले आहे यामध्ये हलाल, झांगडगुत्ता,राजवाडा,जी आर,वाजवुया बॅंडबाजा,भोंगा यांचा समावेश आहे.
सोबतचं सहाय्यक दिग्दर्शक म्हनुन १७ चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे त्यामधे हलाल,जी आर, राजवाडा,अवताराची गोष्ट,मनातल्या उन्हात,नाईट स्कुल, संत सेवालाल,धग,झांगडगुत्ता, हॅलो डार्लींग,मेड फाॅर इच अदर,मस्का,मदन बी वाॅन्टेड,जागर,वाजवुया बॅंडबाजा,३१ ॲाक्टोबर (हिंदी),तुमसे मिलकर(हिंदी) या चित्रपटांचा समावेश आहे.
हिंदी वेबसिरीज उल्लु साठी सहयोगी दिग्दर्शक म्हनुन देखील त्यांनी काम केले आहे.मराठी चित्रपट फंटर साठी क्रियेटिव्ह दिग्दर्शक म्हनुन देखील त्यांनी कार्य केले आहे.
त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल २०१७ उत्कृष्ठ लेखक हलाल चित्रपटासाठी, त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचा २०१८ चा पुरस्कार उत्कृष्ठ लेखक व सहयोगी दिग्दर्शक चित्रपट हलाल, हलाल चित्रपटासाठी फिल्मफेअर चे नामांकन देखील मिळाले आहे.
महाराष्ट्र शासनाचा २०१९ चा पुरस्कार भोंगा या मराठी चित्रपटासाठी उत्कृष्ठ स्क्रिनप्ले मिळाला आहे.
आणि सर्वात महत्त्वाचे भोंगा मराठी चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार उत्कृष्ठ लेखक हा पुरस्कार मिळाला आहे. सोबतचं त्यांच्या आणखी नविन चित्रपट येत आहेत

. ग्रामीण भागातुन आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारा हा कलावंत अल्पावधीतच एवढे यश संपादन करीत आहे ही नवलेखकांसाठी आणि आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. एक नविन संधी म्हनुन आणि करीयर म्हनुन देखील युवा लेखकांनी या क्षेत्रात आपली सुरुवात करावी असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
भविष्यात येणाऱ्या चित्रपटासाठी विदर्भातील आणि प्रामुख्याने अकोल्यातील तरुणांना संधी देण्याचा माझा प्रयत्न राहील असे त्यांनी सांगितले.
आज ग्रामीण भागातील कथेला आणि भाषेला जास्त महत्व प्राप्त झालं आहे म्हणून ग्रामीण भागातील तरुणांनी समोर आले पाहीजे. येणाऱ्या भावी चित्रपट साठी अश्या होतकरू तरुणांची गरज आहे असे प्रतिपादन केले.यावेळी महेंद्र डोंगरे
(वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष)
प्रा. राहुल माहूरे ,प्रा आकाश हराळ,
विक्की मंगला मोटे (अकोल्यातील चित्रपट कलावंत) कुणाल मेश्राम, विशाल नंदागवळी (सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा प्रवक्ता)
अमित लोंढे,राहुल कुरे,आदित्य बावनगडे, अभय तायडे, सोनू वासनिक, प्रशांत खंडागळे,
आकाश शेंडे ,सिद्दु डोंगरे,धम्म वाघमारे,प्रज्वल मेश्राम,प्रथमेश मडामे आदी उपस्थित होते..
…………………………………..
प्रा. राहुल गोवर्धन माहुरे
९८२२२७८९२५