बहिरम मंदिर वर लागणार सव्वा पाच फूट चा कळस 7 फेब्रुवारी ला होणार कळसची स्थापना चांदुर बाजार /प्रतिनिधी

0
1020

बहिरम मंदिर वर लागणार सव्वा पाच फूट चा कळस

7 फेब्रुवारी ला होणार कळसची स्थापना

चांदुर बाजार /प्रतिनिधी

विदर्भातील सर्वात दिर्घ काळ चालणारी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सातपुडा च्या पायथ्याशी असलेल्या बहिरम या ठिकाणी असलेल्या बहिरम बाबा मंदिर च्या बांधकाम पूर्ण झाले असून जवळपास या ठिकाणी 1कोटी रुपयांचा बांधकाम पूर्ण झाले असून या ठिकाणी उज्जैन या ठिकाणी वरून आणलेल्या कळसरोहण दिनांक 7 फ्रेबुवारी ला होणार असल्याची माहिती पत्रकार परिषद ला सुरेंद्र पाटील अध्यक्ष बहिरम बाबा संस्थान यांनी दिली.

सव्वा पाच फूट उंची असलेला कळस हा तांब्याचा असून त्याचे वजन साडे 17 किलो आहे.तर या कळसाला इटालियन गोल्ड पालिस करण्यात आले आहे.बुधवार दिनांक 5 ला या कळस ची परिसरात मिरवणूक निघाली.तर गुरुवारी दिनांक 6 फ्रेबुवारी ला पूजा विधी हे पौंरोहित्य सचिन पाठक तर कळसारोहन देऊरवादा (काजळी) येथील ब्रह्मचारी श्री चंद्रशेखर महाराज यांच्या हस्ते दिनांक 7 फेब्रुवारी ला सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी होणार आहे.त्या नंतर पंचक्रोशीतील भाविकां साठी या ठिकाणी महाप्रसाद चे आयोजन देखील बहिरम बाबा संस्थान कडून करण्यात आले आहे.

हा कळस लोकवर्गणीतून आणि ट्रस्टी यांच्या प्रयत्न ने या ठिकाणी लागणार आहे.या साठी ट्रस्टी यांच्या बरोबर भाविकांचे सुद्धा आभार यावेळी ट्रस्टी यांनी मानले तर बहिरम बाबा संस्थान या ठिकाणी विकास कामे ही लोकवर्गणीतून होत असल्याची माहिती किशोर ठाकरे ,अनिल कडू,प्रकाश पाटील यांनी पत्रकार परिषद ला दिली.

फोटो:-बहिरम बाबा मूर्ती आणि कळस फोटो सेंड केला आहे.