बुरुंगले महाविद्यालयाची कु सलोनी त्रिवेदी उत्कर्ष मध्ये राज्यस्तरावर

0
1067
Google search engine
Google search engine

जळगाव खा च्या विद्यापीठ बहिणाबाई चौधरी येथे झाली स्पर्धा

शेगाव :-  स्थानिक ज्ञानेश्वर मस्कुजी बुरुंगले विज्ञान व कला महाविद्यालयाची बीएससी च्या पहिल्या वर्षात शिकत असलेली विद्यार्थिनी सलोनी त्रिवेदी ही नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय उत्कर्ष सांस्कृतिक स्पर्धेसाठी जळगाव खान्देश येथील बहिणाबाई चौधरी विद्यापीठात झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर पोहोचली आहे .
उत्कर्ष व सामाजिक स्पर्धा कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे नुकतीच संपन्न झाली या स्पर्धेमध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सेवा योजना विभागाची चमू सहभागी झाली होती विद्यापीठाच्या चमूने राज्यस्तरीय फिरता चषक व तीन पारितोषिक पटकावले . चमू व्यवस्थापक डॉक्टर रश्मी जोशी सावलकर यांच्या चमूला सर्व विद्यापीठातून राज्यस्तरीय उत्कृष्ट संघनायक महिला पुरस्कार प्राप्त झाला . रासेयो स्वयंसेवक सलोनी त्रिवेदी सहित नऊ विद्यार्थी व नऊ विद्यार्थ्यांची निवड झाली होती . आपल्याला प्राप्त झालेल्या यशाचे श्रेय ती संस्थेचे अध्यक्ष रामविजय बुरुंगले व प्राचार्य आर ई खडसान यांना देत आहे .नुकत्याच अमरावती येथे पार पडलेल्या कार्यक्रमात कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांनी विजेत्या चा सत्कार केला यावेळी रासेयो प्रभारी संचालक व प्रभारी संचालक आणि जिल्हा समन्वयक अमरावती उपस्थित होते.