वाचनामुळे आत्मविश्वास वाढतो -मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर

288
जाहिरात

 


-आकोटः प्रतिनीधी

प्रतिभावंत लेखकांची पुस्तके वाचल्याने विविध क्षेत्रातील ज्ञान प्राप्त होऊन दैनंदिन जीवनात निर्माण होणारे प्रश्न सहज सोडवण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो असे प्रतिपादन अकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी केले. यावेळी त्यांनी वाचनालयातील उपलब्ध ग्रंथ, अभ्यासिकेतील स्पर्धा परीक्षांची पुस्तके तसेच मासिके यांची पाहणी केली व वाचनालयात जास्तीत जास्त ग्रंथ व तसेच इतर ग्रंथालयीन सेवा अकोट वासियांना उपलब्ध करण्याचे निर्देश ग्रंथपाल संजय बेलूरकर यांना दिले. यानंतर मुख्याधिकारी डोल्हालकर यांनी नगरपरिषद प्रशासनाद्वारे तयार करण्यात येणाऱ्या नवीन अभ्यासिकेच्या सुरु असलेल्या बांधकामाची सुद्धा पाहणी करून नगर अभियंता विशाल वाघमारे, मनीष शर्मा यांना इमारतीचे बांधकाम पूर्ण करून विद्यार्थ्यांकरीता लवकरात लवकर सुसज्ज अशी अभ्यासिका सुरू करण्याच्या सूचना केल्या. यावेळी त्यांनी वाचनालयातील अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला व आवश्यक असलेल्या पुस्तकांची यादी ग्रंथपाल यांना देण्यास सांगितले.
यावेळी नगर अभियंता विशाल वाघमारे, मनीष शर्मा, प्रशासन अधिकारी प्रदीप रावणकर, कर अधिक्षक मयुरी जोशी, श्रीकृष्ण केंद्रे, ग्रंथालय सेवक नितीन हाडोळे तसेच अभ्यासीकेतील विद्यार्थी उपस्थित होते.