बहिरम येथिल पशुप्रदर्शनित, बक्षिस वाटपात गैरप्रकार. *नियमावली डावलून केली,बक्षिसासाठी पशुंची निवड.

0
1026
Google search engine
Google search engine

बहिरम येथिल पशुप्रदर्शनित, बक्षिस वाटपात गैरप्रकार.
*नियमावली डावलून केली,बक्षिसासाठी पशुंची निवड.
*प्रदर्शनित सहभागी पशुपालकांचा आरोप.
*जिल्हा पशुवैद्यकीय अधिकार्यां कडे केली तक्रार.

चांदूरबाजार/प्रतिनिधी

तालुक्यातील ऐतिहासिक बहीरम यात्रेत,नुकतेच एक पशुप्रदर्शन भरविण्यात आले होते.या प्रदर्शनित सहभागी होण्यासाठी जिल्हाभरातील,जातिवंत पशुंसह पशुपालकही सहभागी झाले होते.प्रदर्शनिच्या आयोजकांकडून प्रदर्शनित सहभागी पशुंना, बक्षिसपात्र ठरविण्यासाठी नियमावलीही निश्र्चित करण्यात आली होती.परंतू पारितोषिकासाठी पशुंची निवड करतांना, नियमावली डावलून निकषात न बसणार्यां पशुची निवड करण्यात आली.परिणामी बहिरम येथिल पशुप्रदर्शनित, बक्षिस वाटपात गैरप्रकार झाला आहे.असा आरोप तालुक्यातील, पशुप्रदर्शनित सहभागी पशुपालकांनी लेखी स्वरूपात केला आहे.
सदर प्रदर्शनित झालेला हा गैरप्रकार बेलोरा येथिल पशुपालक, छोटू कडू यांनी संबंधितांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला.परंतू त्यांच्या तक्रारीला कोणत्याही पशुवैद्यकीय अधिकार्याने दाद दिली नाही.विशेष म्हणजे यावेळी जिल्हा पशुसंवर्धन समितीचे सभापती,व चांदूरबाजार पंचायत समितीचे सभापती त्याठिकाणी उपस्थित होते.त्यांच्या समक्ष काही पशुवैद्यकीय अधिकार्यांनी,तक्रारकर्ते कडू यांना, जबरदस्तीने व्यासपीठावरून खाली नेले.तसेच कडू यांना बक्षिस वितरण समारंभ संपन्न होई पर्यंत, व्यासपीठापासून दूरवर थांबवून ठेवले.तक्रार करणार्यालाच पारीतोषिक वितरण सोहळ्या पासून दूर ठेवल्यामुळे,या प्रकरणातील गैरप्रकारा बाबतचा संशय अधिकच दुनावला आहे.
तसेच पशुप्रदर्शनित बक्षिसा करिता पशुची निवड करण्यासाठी,एक हजार रुपयाची मागणी केली.अशी तक्रारही मोर्शी तालुक्यातील ,प्रदर्शनित सहभागी पशुपालकाने इलेक्ट्रॉनिक मिडियाला मुलाखत देतांना केली आहे.तसेच प्रदर्शनीमध्ये सहभागी पशुंना,वैरण व पाणी पुरवठा करण्याकडेही दूर्लक्ष करण्यात आले.प्रदर्शनित सहभागी पशुपालकांनसाठी भोजन व्यवस्था असल्याचेही सांगण्यात आले होते.परंतू त्यांनाही भोजन पास देण्यात आल्या नाहीत.असेही स्पष्टपणे लेखी तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या बाबतची लेखी तक्रार , जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी यांचे कडे करण्यात आली आहे.संबंधित तक्रारीच्या प्रतिलिपी, राज्यमंत्री ना. बच्चू कडू,जिल्हा परिषद अध्यक्ष अमरावती, सभापती पशुसंवर्धन समिती जि.प.अमरावती, सभापती पंचायत समिती चांदूरबाजार, पशुधन विकास अधिकारी चांदूरबाजार इत्यादींना सादर करण्यात आल्या आहेत.तक्रारी नंतरही संबंधितांवर कायदेशीर कारवाई न झाल्यास,तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या तक्रारीत पशुपालकांनी जि.प.प्रशासना दिला आहे.