ऑल इंडिया ज्वेलर्स अंड गोल्डस्मिथ फेडरेशनवर अशोक दादा मुंडगावकर,रामचंद्र येरपुडे

208
जाहिरात

 

अकोटःता.प्रतीनीधी

कन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स दिल्ली अंतर्गत ऑल इंडिया ज्वेलर्स व गोल्डस्मिथ फेडरेशनचे गठण करण्यात आले आहे. बी.सी. भरतिया हे या फेडरेशनचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांनी श्रीरामचंद्र येरपुडे (नागपूर) रा.अध्यक्ष भारतीय स्वर्णकार समाज तथा अकोटचे अशोकराव मुंडगावकर सराफ प्रदेश उपाध्यक्ष यांना फेडरेशनचे संस्थापक सदस्य म्हणून म्मनोनीत करण्यात आले आहे.

ऑल इंडिया ज्वेलर्स व गोल्डस्मिथ फेडरेशन वेळोवेळी सुवर्णकार तथा सराफांच्या अडचणी व योजनांबाबत शासनाला सल्ला तथा सहकार्य देऊन व्यवसाय व देश उन्नतीसाठी मोलाचे कार्य करणार आहे. देशातील सर्व राज्यातून ७० संस्थापक सदस्यांचा या फेडरेशनमध्ये सहभाग असल्याचे श्री येरपुडे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. श्री रामचंद्र येरपुडे व अशोक दादा मुंडगावकर यांची महाराष्ट्र प्रदेश मधून झालेली निवड ही जिल्हावासियांसह अकोटसाठी प्रतिष्ठेची अशी सन्माननीय बाब ठरत आहे. या निवडीबद्दल अकोला जिल्हा अध्यक्ष गोपाळराव लोणकर देवचंदानी, कावडे यांच्यासह संजय हेमराजजी वर्मा, किशोर कट्टा, हेमंतजी वर्मा, प्रमोद बहाळ, गणेश ढोले, सुरेंद्र ढोले सराफ व्यवसाईक आदींनी निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।