आकोटात सीए समर्थन रॅलीला हजारोंचा जनसमुदाय – 900 मीटर लांब तिरंगा ठरला रॅलीचे आकर्षण

0
1123

 

मा. केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, श्रीराम मंदिर ट्रस्टचे स्वामी गोविंददेव गिरीजी यांची विशेष उपस्थिती

अकोट ता.प्रतीनिधी

सीएए समर्थनार्थ राष्ट्रीय सुरक्षा मंचने आयोजित केलेल्या समर्थन रॕलीला अकोट शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.दु. ३ वाजता नेहरू पार्क येथून हजारोंच्या जनसमुदायाने रॅलीला उत्साहात सुरुवात झाली. रॅली शिवाजी महाराज चौक सोनू चौक, जयस्तंभ चौक,पटेल चौक, यात्रा चौक मार्गे मार्गक्रमण करत रॕली नरसिंग मंदिर पटांगणात पोहोचली. रॅलीचे ठीकठिकाणी रांगोळ्या फटाक्यांची आतिषबाजी फुलांचा वर्षावाने जल्लोषात स्वागत झाले. रॅलीत मध्ये 900 मीटर लांब तिरंगा शहरवासीयांचे लक्ष वेधून घेत होता. व्यापारी व नागरिकांनी रॅलीवर फुलांचा वर्षाव करत उत्साहात स्वागत केले. रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी महिलांची संख्या ही लक्ष वेधून घेत होती.

संध्या.५ वा.रॕली सभास्थळी पोहोचली यावेळी मंचावर मा. केंद्रीय मंत्री हंसराज अहिर अयोध्या येथील राम मंदिर ट्रस्ट चे सदस्य श्री स्वामी गोविंददेव गिरी महाराज आ. प्रकाश भारसाकळे नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे आयोजन समितीचे अध्यक्ष अॕड. मोहन आसरकर माजी. नगराध्यक्ष रामू बरेठीया समितीचे संयोजक अजय नवघरे यांच्यासह इतर गणमान्यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष अॕड आसरकर यांनी केले

 

याप्रसंगी आयोध्या राम मंदिर ट्रस्टचे सदस्य म्हणून स्वामी श्री गोविंद देव गिरी महाराज यांच्या झालेल्या निवडी निमित्त आयोजन समितीच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रमुख पाहुणे मा. केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी भयमुक्त समाज व सुरक्षा नक्षलवाद, घुसखोरी आतंकवाद यापासून सुरक्षा पोहोचवणाऱ्या कायद्याच्या बाजूने उभे राहण्याचे नागरिकांना आवाहन केले

 

तर प्रमुख वक्ता राष्ट्रीय संत तपोनिष्ठ स्वामी श्री गोविंद देव गिरी महाराज यांनी राष्ट्रहिताची चिंता केली तर भारत भूमी परंपरा संस्कृती परिपक्व होते त्यामुळे राष्ट्राचा विचार प्रथम; पण काही लोक आपली दुकानदारी संपून जाईल या भीतीने याला विरोध करत आहेत काहींना मुद्दाम भीती दाखवली जाते आहे. त्यामुळे रात्र वैऱ्याची आहे जागते रहो… सबका साथ ..सबका विकास.. सबका विश्वास हेच रामराज्य आहे तेव्हा राष्ट्र बळकट करण्यास सर्वांनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.

सभेचे सूत्रसंचालन व आभार गोपाळ गांधी यांनी मानले.सभेस हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. रॅली व सभेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता तर ठिकाणी पोलिसांचे फिक्स पॉईंट हे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते