गजानन महाराज मंदीर येथे श्रींचा प्रगट दिन महोत्सव

0
620
Google search engine
Google search engine

गजानन महाराज प्रगटदिन महोत्सव निमित्य श्रीराम कथेला प्रारंभ

अकोट : संतोष विणके

अकोट येथील अंजनगाव मार्गावरील गजानन महाराज मंदिर येथे प्रगट दिन महोत्सवानिमित्य श्रीराम कथेला प्रारंभ झाला आहे. गजानन महाराज प्रगट दिन महोत्सवानिमित्य ८ ते १५ फेब्रुवारी पर्यंत दुपारी १ ते ५ या वेळात ह.भ.प. हरिदास महाराज पिपरे यांच्या वाणीतून श्रीराम कथा सुरु आहे. महोत्सवानिमित्य दररोज सकाळी काकड आरती, अभिषेक, संध्याकाळी हरिपाठ व श्रींची आरती होत आहे. ह.भ.प. सुभाष महाराज वर्मा कुटासकर यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज सायंकाळी ८.३० वाजता ह.भ.प. रामकृष्ण महाराज अंबुस्कर, अरुण महाराज सावंत, संभाजी महाराज मेहूण, मोहन महाराज मेतकर, प्रशांत महाराज ताकोते, नंदकिशोर महाराज कोल्हे, सुभाष महाराज काळे यांचे हरिकिर्तन होणार आहे. १५ फेब्रुवारीला मुक्ताई नगर येथील हभप सारंगधर महाराज यांचे काल्याचे किर्तन सकाळी ९ वाजता, त्यानंतर महाप्रसाद व दुपारी ३ वाजता श्रींची मिरवणूक काढण्यात येणार आहे. या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे गजानन महाराज मंदिर विश्र्वस्त मंडळ व उत्सव समितीने कळविले आहे.