*उद्या 14 फेब्रुवारी ला वरुड येथे एक दिवसीय संत्रा निर्यात कार्यशाळेचे आयोजन*

0
882
Google search engine
Google search engine

*वरुड:-*
वरुड व मोर्शीला संत्राचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जातो, या भागात संत्रा उत्पादन भरपूर प्रमाणात होते. त्याकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी शेतमाल पणन प्रक्रिया सहकारी संस्था, महा एफ. पी. ओ. फेडरेशन पुणे व कोगो पोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वरुड मोर्शीतील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी उद्या 14 फेब्रुवारी ला एक दिवसीय कार्यशालेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेमध्ये शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्याकरिता माजी कृषिमंत्री म. रा. डॉ. श्री. अनिल बोंडे, माजी कृषी आयुक्त श्री. पांडुरंग वाठाराकर, उद्योजगता विशेतज्ञ स्मार्ट प्रकल्प महाराष्ट्र सरकारचे श्री. डॉ. संजय पांढरे, कृषी विभागाचे श्री. खर्चान यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यशाळेद्वारे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संत्रा निर्यातमध्ये येणाऱ्या सर्व अडचणी, निर्यातीचे आर्थिक फायदे , जे व्यापाऱ्यांकडून मिळत नाही नाहीत, तसेच आपण कसे निर्यातदार होऊ शकतो या संबंधी सर्व मार्गदर्शन प्राप्त होणार आहे. ही कार्यशाळा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी शेतमाल पणन प्रक्रिया सहकारी संस्था मर्या. शासकीय आद्योगिक प्रशिक्षण केंद्र जवळ, टेंभुरखेडा रोड, एम. आय. डी. सी. वरुड येथे सकाळी 10 वाजता सुरू होत आहे तरी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात येत आहे.