संतांचे चमत्कार हे भगवंताच्या प्राप्तीची उदाहरण – तपोनिष्ठ स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराज

0
1307

शांतीवन अमृततिर्थावर  आज दीपोत्सवाचे आयोजन

रक्तदान शिबिरास महिला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अकोट: संतोष विणके

संतांचे चमत्कार हे भगवंत प्राप्तीची उदाहरण आहेत संतांची कृपादृष्टी झाली की ईश्वर अनुभवता येतो भगवंत जिथे उभे राहतात तिचे तीर्थ होते शांतीवन येथे महाराजांची लीला घडली आणि अमृत तीर्थ हे आज लोकांच्या श्रद्धेचे तीर्थ ठरतंय असे कथा प्रवचन स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले ते संत गजानन महाराज संस्थान (विहीर) शांतीवन अमृत तीर्थ येथे आयोजित कथा सत्संगाचे सहावे पुष्प गुंफताना बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले आपल्या संस्कृतीत ऋषींचे वैभव हे सर्वात मोठे आहे तरुणांनी व्यायाम करणे जरुरी आहे तसेच शक्तीची उपासना, बलाची उपासना करणे हे तारुण्याचं कर्म आहे. कारण बलाची उपासना न केल्यास धर्माची उपासना घडत नाही तसेच अहंकार मी पणा हा देवाकडे चालत नाही. म्हणूनच म्हटले आहे अहंकाराचा वारा न लागो राजसा ईश्वर प्रेमात विरघळणारे अश्रू हे जगात कुठल्याच आनंदासमोर मोठे नाहीत

असे बोलून त्यांनी सहावे पुष्प गुंफले.सहाव्या पुष्पाचा समारोप हा भागवत आरती व संत गजानन महाराजांच्या आरतीने करण्यात आला. कथेनंतर दैनंदिन हरिपाठ व हभप सुभाष महाराज काळे आळंदीकर यांच्या हरी कीर्तनाने उत्सवात रंगत आणली होती.

शांतीवन अमृत तीर्थ ठरतेय प्रती शेगाव

सातपुड्याच्या पायथ्याशी असणारे शांतीवन अमृततीर्थ हे परिसरातील भक्तांसाठी प्रति शेगाव ठरत असून उत्सवानिमित्त कथा स्थळी गर्दीचा जनसागर उसळत आहे गुरुवार असल्याने दु.४ वाजेपर्यंत महाप्रसाद वितरित करण्यात आला तर श्रींच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

श्रींच्या चरणी सेवेसाठी सेवकांची प्रतीक्षा यादी संस्थांना लावावी लागली असून संस्थांनचा प्रगटदिन उत्सव हा लोकोत्सव ठरत आहे.

रक्तदानास महिला भक्तांचा लक्षणीय प्रतिसाद

गुरुवारी कथास्थळी रक्तदान शिबिर पार पडले. श्रींच्या सेवेत रक्तदान करुन पुण्य मिळावे म्हणून अनेक भाविकांनी आपला सहभाग रक्तदान शिबिरात नोंदवत उत्स्फुर्तपणे रक्तदान केले.

यामध्ये महिला भक्तांची संख्या ही लक्षणीय होती दरम्यान रक्तदान शिबिर हे उशिरापर्यंत सुरू होते. शिबिरासाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयाची चमु ही रक्त संकलनासाठी हजर होती.