श्रींच्या प्रगटदिन महोत्सवास शांतीवन अमृत तीर्थ सज्ज

0
902

श्रींच्या मुखवट्याची नगरप्रदक्षिणा काल्याचे किर्तनाने आज महोत्सवाची सांगता

भागवताचे सार म्हणजे भगवंताची भक्ति – स्वामी गोविंददेव गिरी

अकोटःसंतोष विणके

भागवताचे सार म्हणजे भगवंताची भक्ती भगवंताने श्रीमद भागवत धर्मग्रंथात ज्ञानरूपी प्रवेश केला आणि कलियुगातही धर्माचरण करण्यास सकल जनास भगवंत भक्तीचा मार्ग समस्त जणांसाठी उपलब्ध करून दिला आहे. असा कथाउपदेश स्वामी श्री गोविंद देव गिरी महाराज यांनी केला. ते प्रकट दिन महोत्सवानिमित्त आयोजित भागवत कथा सत्संगाचे अंतिम पुष्प गुंफताना ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले काहीजण धर्मपालन करतात त्यांच्या कल्याणासाठी भगवंत पुन्हा कलयुगातही अवतार घेतील सृष्टीचे हे कालचक्र असेच अविरत सुरू राहील भगवंताच्या भक्तीने जगात सात्त्विकता वाढून समाज अधिकाधिक सुखी होईल सर्व सकल जनांना भक्तीचा व ज्ञानाचा हा दिवा भगवान नारायणांमुळं मिळाला तो आपल्याकडे भागवत धर्माच्या परंपरेने चालत आला या संपूर्ण परंपरेला प्रणाम करत संत गजाननाच्या चरणी आपण ही कथा अर्पित करूया

.तसेच जी वस्तू आपल्या प्रगतीला त्रास देत असेल तिचा त्याग करावा आपली वृत्ती सदा निश्चित ठेवावी चिंतन करावे मात्र चिंता नाही असे म्हणून त्यांनी कथेची सांगता केली. कथा सांगता प्रसंगी भागवत आरती संत गजानन महाराजांची आरती व शांतीवन अमृत तीर्थ विहिरीची आरती करण्यात आली. कथेच्या समाप्तीनंतर दैनंदिन हरिपाठ व हरी कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला.

आज श्रींच्या मुखवट्याची नगर प्रदक्षिणा व काल्याचे किर्तन

श्रींच्या प्रगटदिन महोत्सवानिमित्त सकाळी श्रींना मंत्रपठणात दुग्धाभिषेक करुन यज्ञ होमहवन पार पडणार असून दिंड्या पालख्यांसह श्रींच्या मुखवट्याची नगरप्रदक्षिणा होणार असून त्यानंतर ह भ प विठ्ठल महाराज साबळे यांचे काल्याचे किर्तन होऊन महोत्सवाची सांगता होणार.

श्रींच्या सेवेत दीपोत्सव..

संत गजानन महाराज संस्थान (विहीर) शांतीवन अमृत तीर्थ येथे गेल्या पाच वर्षांपासून प्रकट दिन महोत्सवाच्या पूर्वसंध्येला दीपोत्सव साजरा होत आहे.काल दीपोत्सवात सुमारे दहा हजार दिव्यांनी शांतीवन अमृत तीर्थ परिसर उजळून निघाला होता त्यामुळे प्रकट दिनाच्या पूर्वसंध्येला परिसरात वेगळेच नवचैतन्य भाविक भक्त अनुभवत होते.

भक्तांच्या सोयीसाठी संस्थानचे  आधार स्वास्थ सहयोग केंद्र

संस्थांनच्या वतीने भाविक भक्तांच्या सोयीसाठी वर्षभर विनामूल्य आधार स्वास्थ सहयोग केंद्र लोकार्पण करण्यात आले असून या केंद्राद्वारे वाॕकर, स्ट्रेचर, बेड,स्टीक यासह इतर उपयोगी अशा सुविधांची उपलब्धता वर्षभर परिसरातील गावकऱ्यांचं गरजुन करता उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.