चांदूर रेल्वे पोलीसांची गौरखेडा येथे अवैध दारू अड्ड्यावर मोठी कारवाई – २ लाख १२ हजारांची दारू, मोहा सडवा व इतर मुद्देमाल नष्ट

0
546
एसडीपीओ तांबे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार दिपक वानखडे यांची कारवाई
चांदूर रेल्वे –
चांदूर रेल्वे तालुक्यातील गौरखेडा येथील शेतशिवारात तयार होणाऱ्या अवैध गावठी दारू अड्डावर एसडीपीओ तांबे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार दिपक वानखडे यांनी शुक्रवारी सकाळी ६ वाजता मोठी कारवाई केली असुन यामध्ये २ लाख १२ हजारांची दारू, मोहा सडवा व इतर मुद्देमाल नष्ट केला आहे. चांदूर रेल्वे पोलीसांवर अवैध धंद्यांवर सतत कारवाईचा सपाटा सुरूच आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे यांच्यासह गौरखेडा येथे गेलेल्या पोलीस पथकाने आरोपी मनोज पवार याच्या शेतातील दारू अड्ड्यावर धाड टाकली. यामध्ये २५० लीटर गावठी दारू किंमत २५ हजार रूपये, ३१ ड्रम मोहा सडवा किंमत १ लाख ८७ हजार रूपये असा एकुण २ लाख १२ हजारांचा माल नष्ट करण्यात आला आहे. यामध्ये आरोपी मनोज सुभाष पवार व साबरसिंग पवार यांना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाईत एसडीपीओ तांबे, ठाणेदार दिपक वानखडे, पीएसआय चौधरी, ब्राम्हण, एएसआय मनोहर जाधव, हवालदार श्रीकृष्ण सिरसाट, रामेश्वर चव्हाण, अविनाश देशमुख, चंद्रशेखर पाठक, संदीप सिरसाट, अविनाश वाघमारे, पुरूषोत्तम यादव, संतोष राठोड, सुरेंद्र वाकोडे, अरूण भुरकाडे, नरहरी मुरकुटे, मनोज वानखडे, चालक पंकज शेंडे, महिला पोलीस आरती कुंजेकर, निलीमा बांते, माधुरी पुसदकर यांचा समावेश होता.
कळमगाव मध्ये ५७ दारू बॉटल्स जप्त
कळमगाव येथील आरोपी अनामत किसन राऊत (वय ४२) यांच्याकडे ९० मि.ली.च्या ५७ देशीदारू बॉटल्स किंमत अंदाजे १ हजार ७१० रूपये आढळून आल्या. आरोपीविरूध्द ६५ (ई) मुंबई दारूबंदी कायदा प्रमाणे कारवाई करून अटक करण्यात आली. ही कारवाई ठाणेदार दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार रामेश्वर चव्हाण, पोकॉ नरहरी मुरकुटे, रूपेश धारपवार, मपोकॉ सुषमा मडावी यांनी केली.