ठाणेदार दिपक वानखडे यांची तंबाखू विरोधी कोटपाची विशेष मोहीम – मालखेड मध्ये पाच जणांवर कारवाई

77
जाहिरात

चांदूर रेल्वे –

धूम्रपान आणि तंबाखू – मावा सेवनाच्या व्यसनामुळे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. त्यात मुले आणि महाविद्यालयीन युवक बळी ठरत आहेत. त्यांचे दुष्पपरिणाम लक्षात घेता चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिपक वानखडे यांच्या नेतृत्वाखाली तंबाखू विरोधी कोटपाची विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यात सार्वजनिक धूम्रपान आणि शाळा – कॉलेजजवळ तंबाखूची अवैध विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली. मालखेड (रेल्वे) मध्ये पाच जणांवर ही कारवाई करण्यात आली.

चांदूर रेल्वे तालुक्यातील मालखेड (रेल्वे) येथे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, तंबाखूजन्य पदार्थ विक्री करून कायद्याचे उल्लघंन करणाऱ्या ५ जणांवर सिगारेट – तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध कायदा (कोटपा) अंतर्गत कडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे आता नागरिक सतर्क होतांना दिसत आहे. एकूण कॅन्सर रुग्णांपैकी सर्वात जास्त म्हणजे ५० टक्के कॅन्सर हे केवळ तंबाखू वापरामुळे होतो. केवळ ३० टक्केच लोक रुग्णालयात उपचार घेतात. समाजात तंबाखू सेवनावर प्रतिबंध आल्याशिवाय त्याचे प्रमाण कमी होणार नाही. कोटपा कायद्याची चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत नियमीत प्रभावी अमंलबजावणी केल्यास तंबाखूमुळे होणारे कॅन्सरचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.

कोटपा कायदा म्हणजे काय ?

सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंध कायदा अधिनियम २००३ हा केंद्राचा कायदा आहे. या कायद्यात एकूण पाच प्रमुख कलमे आहेत. त्यापैकी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे गुन्हा आहे. कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्ड आवारात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर प्रतिबंध आहे. तसेच बालकांना किंवा बालकांकडून तंबाखूजन्य पदार्थ विक्री केल्यास १ लाख रुपये आणि ७ वर्ष शिक्षेची तरतूद आहे. बाल न्याय कायद्यानुसार कारवाई करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।