महाराणी येशूबाई यांची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड 19 फ्रेबुवारी ला चांदुर बाजार मध्ये जगदंब पब्लिक स्कूल च्या स्नेहसंमेलन ला राहणार उपस्थित

0
4175
Google search engine
Google search engine

 

चांदूरबाजार/प्रतिनिधी

सध्या टीव्ही मालिकांतील महाराष्ट्रभर गाजत असलेली, मराठी संभाजी मालिकेतील येशुबाई सर्वज्ञात आहे. नव्हेतर या मालिकेतील छत्रपती शंभाजी राजे व येशुबाई ,अबाल वृध्दांच्या हृदयात विराजमान झाली आहे. या मालिकेतील नटी प्राजक्ता गायकवाड,अर्थात छत्रपती शंभाजी राजांची येशुबाई १९ फेब्रुवारीला चांदूरबाजार शहरात येणार आहे.

स्थानिक जगदंब पब्लिक स्कूल व ज्युनिअर सायन्स कॉलेजच्या,दोन दिवसीय स्नेहसंमेलनात पहिल्या दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता हजेरी लावणार आहे. शाळेतील दोन दिवसाच्या संमेलनाचे उद््घाटन १९ फेब्रुवारीला,सायंकाळी ५-३0वाजता राज्यमंत्री बच्चू कडू यांचे हस्ते होणारआहे.या सोहळ्याला ना. कडू व प्राजक्ता गायकवाड यांच्यासह, नगराध्यक्ष रविन्द्र पवार, पं. स. सभापती राजेश वाटाणे, नगर सेवक नितिन कोरडे , विभागीय शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदौर, शिक्षणाधिकारी निलिमा टाके, गट शिक्षणाधिकारी अशोक खाडे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दिनांक २0 फेब्रुवारीला सायंकाळी साडेपाच वाजता, शालेय सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तहसीलदार उमेश खोडके हे असतिल.तर प्रमुख पाहुणे म्हणून अमरावतीचे माजी महापौर विलास इंगोले, जिजाऊ बॅंकचे अध्यक्ष अविनाश कोंडाळे, ठाणेदार उदयसिंह साळुंके,बेलोरा ग्रां.पं. सरपंच दिपाली गोंडीकर उपस्थित राहणार आहेत. तसेच जगदंब शाळेचे अध्यक्ष विनोद कोरडे, सचिव छाया कोरडे,सदस्य मनोज कटारिया, उदय देशमुख, मनिष एकलारे, दत्ता देशमुख, विनोद सोलव, संगीता कोरडे,या स्नेहसंमेलनाला उपस्थित असतील.
तरी या दोनदिवसीय सोहळ्यात विद्यार्थ्यांचा आनंद व्दिगुनित करण्यासाठी, पालकांनी व नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे.असे आवाहन शाळेच्या प्राचार्या सोनिया शिरभाते यांचे सह,समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे

विद्यार्थी यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचा प्रत्येक क्षेत्रात विकास व्हावा यासाठी दरवर्षी स्नेहसंमेलन आयोजित करून सिने अभिनेते,सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती राहते तर प्रत्येक क्षेत्रात विद्यार्थी यांनी आपली आवड तयार करून स्वतःची ओळख निर्माण करावी.हा या मागील प्रमुख उद्देश असल्याचे संस्थेचे अध्यक्ष विनोद कोरडे यांनी सांगितले.