देऊळगांव येथे रासेयो शिबिरात रंगले कविता कथा मधून प्रबोधन….

0
697
Google search engine
Google search engine

आकोटः संतोष विणके

श्री शिवाजी महाविद्यालय,अकोट येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबीरात ग्राम देऊळगांव येथे प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून कवी विलास ठोसर व सुप्रसिद्ध वऱ्हाडी कथाकार नरेंद्र इंगळे ,कार्यक्रम अधिकारी प्रा. विलास तायडे यांची उपस्थिती होती….
कार्यक्रमाची सुरूवात “संत गाडगेबाबा तुमचे स्वप्न साकार झाले ” या अमरावती विद्यापीठ गीताने करण्यात आली….
तर त्या नंतर कवी विलास ठोसर यांच्या अनेक बहारदार कवितानी कार्यक्रमात रंगत आणली…तसेच सुप्रसिद्ध वऱ्हाडी कथाकार नरेंद्र इंगळे यांनी आपल्या आनोख्या शैलीत व विनोदी किस्से सादर करत हास्याचे फवारे उडवत कथा मधून प्रबोधन केले…
कार्यक्रमाला देऊळगाव येथील सरपंच अविनाश गावंडे आणि माजी प.स. सभापती कांतिराम गहले यांची प्रमुख उपस्थिती होती….

कार्यक्रमात कवी विलास ठोसर यांनी लेक ,गळफास ,झूरणी, तोंडाचे चटके ,संसार लयबध्द रचना सादर करत अभंग ढोंग, भिऊ नकोस प्रबोधनपर ,शेतीमातीच्या बहारदार रचना सादर करत कवितांचा पाऊस पाडत रसिकांना चिंब रिझवले…
त्याच प्रमाणे सुप्रसिद्ध वऱ्हाडी विनोदी कथाकार नरेंद्र इंगळे यांनी शाळा सोयरीक व बि. काॕम भाग २ला अभ्यासक्रमात असलेली आपली पारख कथा सादर करून शिबीरार्थ्यांची मने जिंकली…
कार्यक्रमाचे सुंदर संचालन कु.वैष्णवी इंगळे हिने केले…तसेच कार्यक्रमाला विद्यार्थी,शिबीरार्थी शिक्षकवृंद व मोठ्या संख्येने गावकरी मंडळी यांची उपस्थिती होती….