विद्यार्थ्यांनी आव्हानातून वाट घडवावी- प्रा. यादव वक्ते

0
604
Google search engine
Google search engine

अकोला थिआँसॉफिकल सोसायटीतर्फे प्रतिभावंतांचा सत्कार सोहळा

अकोलाःसंतोष विणके

विद्यार्थ्यांना चिंतन, वाचन, मननातून व्यक्तिमत्त्व विकासाचा मार्ग मिळतो. त्यासाठी अभ्यासात सातत्य असले पाहीजे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर केले पाहिजे. काळाशी सुसंगत ज्ञान प्राप्त करून विद्यार्थ्यांनी आव्हानातून वाट घडवावी, असे आवाहन प्रा. यादव वक्ते यांनी केले.
अकोला थिआॅसॉफिकल सोसायटीतर्फे रविवारी राऊतवाडीस्थित ब्रह्मविद्या मंदिरात आयोजित प्रतिभावंतांचा सत्कार सोहळा व नवीन सभासदांच्या प्रमाणपत्र वितरण सोहळ््यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. संत-महापुरुषांचे विचार जीवनाला नवी दिशा देतात, त्याचा अंगीकार विद्यार्थ्यांनी करून आपले आयुष्य उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन डॉ. प्रीती माथने यांनी अध्यक्षीय भाषणात केले. कार्यक्रमात आध्यात्मिक लेखक एस. के. कदम यांच्या ‘इदं न मम’ या लेख संग्रहास जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव रणजित पवार यांनी केले. समाजाला आध्यात्मिक विचारांनी गरज असून, यातूनच संस्कारशिल पिढी घडू शकते, असे विचार कीर्तनकार डॉ. कल्याणी पद्मणे यांनी व्यक्त केले.
मान्यवरांचे स्वागत डॉ. आर. आर. रणपिसे, संगीता सोनोने यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अशोक सोनोने यांनी केले. कार्यक्रमात सोसायटीचे नवीन सभासद कस्तुरी धाराशिवकर, प्रा. श्रीकांत उखळकर, दृष्टी सिंह, अनिल पुंडकर, सरोज पुंडकर, आकाश आमटे, जया मांजरे, राजू चिमणकर आदींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा क्रिकेट संघाचा कर्णधार प्रबल चौखंडे, मोनिका वकारे, नेत्रा माथने, अंकिता खारोडे यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला उपाध्यक्ष संगीता सोनोने, डॉ. सुनीता खारोडे, मेघा रणपिसे, किरण वकारे, दीपाली वकारे, पार्वती कदम, नरहरी दांदळे, प्रदीप वालचाळे, सुभाष खंडारे, रामभाऊ भटकर, मोरेश्वर चोखंडे, शिंदे , मुरकर महाराज यांच्यासह सभासदांची उपस्थिती होती.