गुरुमाऊलींच्या जयंती महोत्सवात डाॕ.जलाल सय्यद महाराजांचे हरिकिर्तन

279
जाहिरात

————————-

मुस्लिम किर्तनकाराचे मुखातून ज्ञानेश्वरी गाथा निरुपण
————————-
आकोटः संतोष विणके

गुरुमाऊली श्रद्धेय श्री संत वासुदेव महाराज जयंती निमित्त आयोजित किर्तन महोत्सवातील पहिले पुष्प प्रख्यात किर्तनकार विद्याभूषण ह.भ.प.डाॕ. जलाल सय्यद महाराज गुंफणार असून या किर्तनाला मोठा जनसमुदाय हजेरी लावणार आहे.

गुरुमाऊली श्री संत वासुदेव महाराज यांचा १०३वा जयंती महोत्सवाला १९फेब्रुवारीला प्रारंभ होत आहे. या निमित्ताने आयोजित किर्तन महोत्सवात दररोज रात्री ८ते १० दरम्यान नामांकित किर्तनकारांची किर्तने भाविकश्रोत्यांना पर्वणी ठरणार आहे.पहिले किर्तनपुष्प संत वाङमयाचे गाढे अभ्यासक डाॕ जलाल सय्यद महाराज गुंफणार  आहेत.

मुस्लिम किर्तनकाराचे मुखातून ज्ञानेश्वरी व गाथा चिंतन ऐकण्याची मोठी उत्सूकता भाविकांना आहे.
या किर्तनाला भाविकांनी मोठ्या संख्येने हजर राहून सर्वधर्म समभाव व सामाजिक ऐक्य वृद्धींगत करणा-या वारकरी चळवळीला बळ द्यावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.वासुदेवराव महल्ले यांनी केले आहे.
————————-

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।