कळंब येथे ३० विद्यार्थ्यांना विषबाधा?

0
862
Google search engine
Google search engine

कळंब येथे ३० विद्यार्थ्यांना विषबाधा?उस्मानाबाद /प्रतिनीधी

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुका शहरातील ऐका शाळेतील ३० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली अशी अफवा होती कि हा ड्रामा होता हे नेमक काय घडल व कुठे घडले हे कोणालाच समजत नव्हतेउस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुका शहरातील ऐका शाळेतील ३० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली अशी अफवा होती कि हा ड्रामा होता हे नेमक काय घडल हे जाणुन घेऊ याकळंब येथील विद्याभवन हायस्कूल मध्ये उस्मानाबाद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , उस्मानाबाद . माननीय जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या सूचनेनुसार उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापनाचे रंगीत तालीम घेण्यासाठी हि सर्व टिम शाळेत पोहचली व संबंधीत विभागाला हा ड्रामा आहे पण हे गोपनीय ठेवण्याचे आदेश देण्यात आले.व शाळेतील तीस विद्यार्थ्यांना यासाठी ऐकत्र बोलावून त्यांना ड्रामा कसा करायचा हे शिकवले व लागली शाळेच्या मुख्याद्यापकांनी दवाखान्यात ,तहसिल ,पोलीस ठाण्यात फोन करुन विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असा फोन केला तात्काळ शहरातून रुग्णवाहिका व पोलीस विभागाच्या गाड्या सायरन देत शहरातून धावत होत्या.शहरात अचानक काय कडले अशी चर्चा सुरु झाली होती.सर्व पालकही शाळेच्या दिशेने धावत होते.ऐकच खळबळ सुरु झाली.परंतू हा खरा प्रकार नव्हता हा फक्त ड्रामा होता.ही रंगीन तालीम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे व टीम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली होती या आपत्ती व्यवस्थापन रंगीन तालममध्ये उपविभागीय अधिकारी श्रीमती. अहिल्या गाठाळ, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉक्टर जे के वायदंडे ,गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती कळंब संजीव बागल १०८चे डॉक्टर प्रशांत जोशी डॉक्टर अभिजीत लोंढे पोलीस निरीक्षक पी बी दराडे डॉक्टर सुधीर आवटे पालक दत्तात्रय गायकवाड प्राध्यापक अरविंद शिंदे नायब तहसीलदार असलम जमादार शाळेची एक गुप्त टीम तयार करण्यात आली याचे प्रमुख शाळेचे मुख्याध्यापक विलास पवार होते यामध्ये सुनील बारकुल, सुशिलकुमार तीर्थकर, संभाजी गिड्डे व विद्यालयातील इयत्ता आठवीचे 15 विद्यार्थी व 15 विद्यार्थिनीने सहभाग घेतला होता जिल्हा आपत्ती यंत्रणेकडून तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणेच्या कार्य क्षमतेची पडताळणी करण्यात आली सदर रंगीत तालीम मध्ये सहभागी यंत्रणा यानि चागला सहभाग नोंदविला व शाळेच्या मुख्याध्यापक यांनी विशेष असे कार्य करण्यात आपले योगदान दिले आशा रंगीत तालीम वारंवार घेण्यात यावी अशी अपेक्षा समाजा कडून व्यक्त करण्यात आलीराज्य परिवहन कळंब, नगरपरिषद , याचे प्रतिनिधी आले नाहीत .प्रतिसाद अभूतपूर्व – पोलीस वेळेत व दंगलपथका सोबत, वाहतूक पोलिसांनी शाळे बाहेर योजिनोयाजन केले होते . जिल्हा रुग्णालयाचे २अधीक्षक आपल्या 9 डॉक्टर व 4 स्टाफ नर्स व औषधांचा साठा घेऊन उपस्तीत होते.