गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त चांदूर रेल्वे येथे भव्य निःशुल्क मधुमेह तपासणी, मार्गदर्शन शिबिर

0
450
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे : चांदूर रेल्वे येथील संताबाई यादव नगरातील संत गजानन महाराज मंदिरात गजानन महाराज प्रगट दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त मधुमेह मुक्त भारत अभियान राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. रवींद्र नांदेडकर व मंगेश बोबडे, चांदूर रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने गजानन महाराज मंदिर, संताबाई यादव नगर येथे
 ‘फ्री डायबिटीस आणि प्री डायबिटीस’ निशुल्क तपासणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात १७६ रुग्णांची मधुमेह रोगाची तपासनी करण्यात आली. या वेळी सिद्धार्थ जांभुळकर, श्री भस्मे, योगिता काळे यांनी मधुमेह रोगाबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला गजानन महाराज मंदिराचे आयोजक सुरेश तिखे, उमेश ढगे, लक्ष्मण दर्येकर, अशोक मसतकर, सुनिल खेरडे, राजेश देवके,  मारोतराव भोले, सचिन चंदाराना, बालु टावरी, विजय वानखडे, विक्की कविटकर, सारंग देशमुख, नगर सेवक प्रफुल्ल कोकाटे , वैभव गायकवाड, नगरसेविका स्वाती मेटे, नीलिमा शर्मा, सारिका तिवारी  यांच्यासह चांदूर रेल्वे परिसरातील पुरुष व महिला मंडळी मोठ्या संख्येने हजर होते.