पाण्याचे उत्तम नियोजन केले नाही तर जीवसृष्टी धोक्यात – डॉ. स्नेहल कणीचे

0
554
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे –
 पाण्याचे योग्य नियोजन केले नाही तर जीवसृष्टी धोक्यात येऊन आपणास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, त्यामुळे पाण्याचे नियोजन करून काटकसरीने वापर करा व जलसंवर्धन करा असे आवाहन अमरावती जिल्हा उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कणीचे यांनी केले. त्या बहुउद्देशीय महिला विकास संस्थेच्या चांदूर रेल्वे येथे घेण्यात आलेल्या स्नेहसंमेलन प्रसंगी बोलत होत्या.
 पाणी संवर्धन व जैविक विविधता विषयावर  संस्थेचे कार्य चांगले करीत असल्याने संस्थेचे त्यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावती वनविभागाचे सेवानिवृत्त सहायक वन संरक्षक जी.टी. इंगळे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून त्याच विभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक ज्योती पवार तसेच संस्थेचे सल्लागार राजीव अंबापुरे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमामध्ये माजी सैनिक जगन्नाथ गवई यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता संगीता जवंजाळ, उज्‍वला मने, कविता खंगार, शोभा वाघ, परेका नंदरधने, नेहा मालकर, राधिका बामनेल, रजनी अजमिरे, रजनी इंगोले इत्यादी महिलांनी कार्यक्रमासाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्चना अंबापुरे तर संचालन अंजली गवई, आभार प्रदर्शन भावना मढाईत यांनी केले.