*चांदूर मध्ये भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन* * ठाणेदार यांच्या हस्ते मैदानाचे भूमिपूजन संपन्न* स्थानिक

0
738

*चांदूर बाजारात भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन*
* ठाणेदार यांच्या हस्ते मैदानाचे भूमिपूजन संपन्न*
स्थानिक:

चांदुर बाजार

नगरपरिषद कनिष्ठ महाविद्यालय चांदूर बाजार येथे श्री हनुमान क्रीडा सांस्कृतिक व व्यायाम मंडळ चांदूर बाजार व सियाराम हेल्थ क्लब चांदूर बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीच्या पावन पर्वावर ६५ किलो वजन गटाच्या दिनांक २१, २२ व २३फेब्रुवारी २०२०रोजी होणाऱ्या कबड्डी स्पर्धेकरिता मैदानाचे भूमिपूजन चांदूर बाजार पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री उदयसिंह साळुंके,विनोद कोरडे, विजय विल्हेकर ,अतुल रघुवंशी, मनोज कटारिया ,तसेच स्पर्धेचे आयोजक टिकू अहिर व गोपाल तिरमारे यांचेसह सर्व पत्रकार मंडळीच्या उपस्थितीमध्ये आणि दैवज्ञ श्री कैलास कठाळे शास्त्री यांच्या पौरहित्या मध्ये दिनांक १८फेब्रुवारी संपन्न झाला.
चांदूर बाजार नगरपरिषद कनिष्ठ महाविद्यालय चांदूरबाजार येथे श्री हनुमान क्रीडा,सांस्कृतिक व व्यायाम मंडळ तसेच सियाराम हेल्थ क्लब चांदूर बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीच्या पावन पर्वावर चांदूरबाजार शहरामध्ये प्रथमतः मॅटवर ६५ किलो वजन गटाच्या स्पर्धेचे उद्घाटन दिनांक २१ फेब्रुवारी २०२० रोजी तसेच बक्षीस वितरण समारंभ दिनांक २३ फेब्रुवारी २०२०रोजी आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेमध्ये विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील कबड्डीचे चमू सहभागी होणार आहे सहभाग घेणार आहे आहे दिनांक २१ फेब्रुवारी २०२० रोजी सुरू होणाऱ्या कबड्डी स्पर्धेच्या मैदानाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम नगरपरिषद कनिष्ठ महाविद्यालय चांदूर बाजार चे प्रांगणामध्ये ठाणेदार उदयसिंह साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली गणमान्य व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यावेळी अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन आयोजकांकडून नियमित व्हावे अशी अपेक्षा ठाणेदार श्री उदय साळुंखे यांनी उपस्थितांसमोर घेतले व्यक्त केली. कबड्डी या खेळाचा प्रचार आणि प्रसार तसेच शहरासह ग्रामीण भागातील युवकांमध्ये कबड्डी या खेळाची आवड निर्माण व्हावी याकरिता जास्तीत जास्त युवकांनी या कबड्डी स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन कार्यक्रमांमध्ये उपस्थिती दर्शवावी असे आव्हान कार्यक्रमाचे आयोजक नगर परिषदेचे बांधकाम सभापती टिकू अहिर व व आरोग्य सभापती गोपाल तिरमारे,विकी देशमुख यांनी केले.

फोटो:-भूमिपूजन फोटो मेल केला आहे.