परळीत महाशिवरात्रीनिमित भाविकांच्या सोयीसाठी बस स्थानक ते वैद्यनाथ मंदिर विशेष बस सेवा : आर बी राजपूत*

0
726
Google search engine
Google search engine

परळीत महाशिवरात्रीनिमित भाविकांच्या सोयीसाठी बस स्थानक ते वैद्यनाथ मंदिर विशेष बस सेवा : आर बी राजपूत

प्रतिनिधी:नितीन ढाकणे
_खाजगी वाहतूकदारांच्या अव्वाच्या सव्वा दराला बसणार आळा; बस सेवेत भाविकांना प्रत्येकी आठ रुपयांत आकारले जाणार आहेत.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येत्या २१ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री महोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्तानी परिवहन महामंडळाच्यावतीने भावीक भक्तांच्या सोयीसाठी सकाळी सहा वाजेपासून बस स्थानक ते वैद्यनाथ मंदिर अशी विशेष बस सेवा देणार आहे अशी माहिती आगार प्रमुख रणजित बलदेव राजपूत यांनी दिली आहे.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असल्यामुळे परळीत शिवरात्री पर्वासाठी देशभरातून भाविक भक्त दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात. दरम्यानच्या काळात कित्येक खाजगी वाहतूक चालक भाविकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे आकारतात. कधीकधी खाजगी वाहतूकदारांचा दर शंभर रुपयांपर्यंत घेतला त्याऐवजी या बस सेवेत प्रत्येकी आठ रुपयांपर्यंत दर आकारला जाईल. जातो त्यामुळे भाविकांची मोठी अडचण होते. यावर उपाय म्हणून यंदा पहिल्यांदाच परिवहन खाते या अनुषंगाने बस स्थानक ते वैद्यनाथ मंदिर वाहनतळ अशी विशेष बस सेवा उपलब्ध करून देणार आहे.

यासोबतच शिवरात्री निमित्त परळी ते अंबाजोगाई, गंगाखेड, सोनपेठ मार्गांवर शटल बसेसची संख्या वाढविण्यात येणार आहे अशीही माहिती रणजित बलदेव राजपूत यांनी दिली.