गुरुमाऊली जयंती महोत्सवाला भक्तीमय प्रारंभ

0
808

आकोट :संतोष विणके

हभप.ज्ञानेश्वर माऊली कु-हाडे यांचे हस्ते उद् घाटन संपन्न

गुरुमाऊली श्रद्धेय श्री संत वासुदेव महाराज यांचा १०३वा जयंती महोत्सवाला भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला.श्री ज्ञानेश्वरीचे प्रवक्ते ज्ञानपंडीत ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली कु-हाडे यांचे हस्ते भागवत ध्वज पुजनाने या भक्तीसोहळ्याचे उद् घाटन पार पडले.यावेळी ह.भ.प.प्रल्हाद महाराज भांडे,संस्थाध्यक्ष ह.भ.प.वासुदेव महाराज ,उपाध्यक्ष बाबाराव बिहाडे,गंगाधर गोहाड,कोषाध्यक्ष पुरुषोत्तम लाजुरकर,सचिव रविंद्र वानखडे,सहसचिव मोहनराव पु.जायले,अवि गावंडे, विश्वस्त दादाराव पुंडेकर, महादेवराव ठाकरे,सौ.सुनंदा आमले,सदाशिवराव पोटे, प्राचार्य गजानन चोपडे,अशोकराव पाचडे,नंदकिशोर हिंगणकर अनिल कोरपे,गजानन दुधाट आदी हजर होते

————————-
श्री ज्ञानेश्वरी ज्ञानाचा अथांग सागर आहे!
ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कु-हाडे
……………….:
श्री ज्ञानेश्वरी भाव कथा-प्रथम पुष्प
……………..
मराठी वाङमयाच्या विश्वात श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ अलौकिक आहे.श्री ज्ञानेश्वरी वाङमयाचा प्राण आहे.वाङमयातून ज्ञानेश्वरी वजा केली तर वाङमयाचा प्राणच निघून जाईल. आणि म्हणूनच ‘माझ्या मराठीचे बोल कौतुके। परि अमृतातेही पैजा जिंके।…….हा माऊलींचा स्वाभिमान सार्थ वाटतो.ज्ञानेश्वरी श्रवण मनन चिंतन केल्यास मनुष्याचे मनातील विकार नष्ट होवून हृदयी सात्विकतेचा पाझर फुटतो.समाधीवस्था प्राप्त होते.म्हणूनच प्रत्येकाने ज्ञानेश्वरीची एकतरी ओवी अनुभवावी असे चिंतन ज्ञानेश्वरी ग्रंथराजातील भाव उलगडतांना चिंतन ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कु-हाडे यांनी मांडले.

आपल्या अमोघ अमृतवाणीतून महाराजांनी भाविकश्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.ते पुढे म्हणाले. अध्यात्म शास्त्राशिवाय जीवनाला पुर्णत्व प्राप्त होत नाही.इतर शास्त्र व्यावहारिक शास्त्र आहेत.त्यातून भौतिक सुख मिळते मात्र आपले दुःख दूर करु शकत नाही. तर अध्यात्म शास्त्रातून परम सुखाची प्राप्ती होते.दुःख दूर होते.भगवंताने सांगितलेली भगवद् गीतेत अध्यात्म आहे.ते जगाच्या कल्याणासाठी प्रगटली त्यावरील माऊलींनी टिका करुन हे ज्ञान सर्वसामान्यापर्यंत पोहोचविले आहे असे सांगत क-हाडे महाराजांनी अनेक दृष्टांत सांगून ज्ञानेश्वरी भावकथेतील भाव प्रगट केला..दरम्यान संस्थेचे अध्यक्ष वासुदेवराव महल्ले यांनी केले.

शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना भावपूर्ण अभिवादन करतांना शिवछत्रतींचा जाज्वल चरित्राला या प्रसंगी कु-हाडे महाराजांनी उजाळा दिला.
————————-

जयंती महोत्सवाला राज्यभ-यातून आलेल्या वासुदेव भक्तांनी श्रद्धासागर फुलून गेले.दरम्यान संस्थेचे विश्वस्त दादाराव पुंडेकर आणि सौ.पुष्पाताई पुंडेकर यांचे हस्ते तिर्थस्थापना व ग्रंथ पुजन झाले तद्नंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुहिक पारायणाला सुरुवात झाली.पारायणाला गांवोगांवचे भाविक सहभागी झाले आहे.पारायणपीठाचे नेतृत्व ह.भ.प.अंबादास महाराज मानकर करित आहेत. ज्ञानयज्ञाचा प्रारंभ गुरुवंदनेने झाला.मधुकरराव तराळे,एदलापूर,वनोजा ,दिवठाणा,वाई,चंडीकापूर येथील मंडळींनी गुरुपुजन केले.

हभ.प.प्रल्हाद महाराज भांडे यांनी आपल्या प्रवचनात गुरुवर्यांनी विरचित ‘गीता अभंग’ ग्रंथाचे निरुपण केले.

किर्तन महोत्सवात १००८ महामंडलेश्वर विद्याविभुषण डाॕ जलाल सय्यद महाराज यांचे किर्तन पार पडले.किर्तनाला सर्व जाती धर्माच्या श्रोत्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली