अवैध गाई ची वाहतूक करणाऱ्या वर पोलिसांचा सापळा ,9 गाई ची जिवंत सुटका आरोपीचा शोध सुरू शिरजगाव कसबा पोलिसांची कार्यवाही

0
1400
Google search engine
Google search engine

अवैध गाई ची वाहतूक करणाऱ्या वर पोलिसांचा सापळा ,9 गाई ची जिवंत सुटका
आरोपीचा शोध सुरू शिरजगाव कसबा पोलिसांची कार्यवाही

चांदुर बाजार:-

गौवंश मास विक्री बंद असताना रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चांदुर बाजार तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध पणे कत्तलीसाठी जाणाऱ्या गौवंश ची वाहतूक सुरू आहे.त्यामुळे अवैध गौवंश तस्करी व त्यांच्या मास विक्री वर कार्यवाही होणे आवश्यक आहे.शिरजगाव कसबा पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी दिनांक 18 फेब्रुवारी ला रात्री 11 च्या 9 गाई यांची जिवंत सुटका केली.

ग्राम देऊरवाडा येथील पूर्णा नदी पात्र मधून या अवैध पणे गौवंश यांची पायदळ वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्या आधारे शिरजगाव कसबा चे ठाणेदार गोपाल उपाध्यय सापळा रचून गौवंश तस्करी करणाऱ्यांवर आपला पंजा टाकला.मात्र पोलिसांना बघताच जनावर वाहतूक करणारे यांनी पळ काढला असून पोलिसांनी गौवंश आपल्या ताब्यात घेऊन छोटू पहलवान यांच्या सह दोघावर गुन्ह्याची नोंद केली.तर या कार्यवाही मध्ये पशुवैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता सर्व गाई असल्याचे निष्पन्न झाले.तर एकूण 72000 रुपयांचा मुद्देमाल या मध्ये जप्त करण्यात आला आहे.तर त्यांची सध्या देऊरवाडा या ठिकाणच्या कोंडवाण्यात व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सदर कार्यवाही अमरावती ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. हरी बालाजी एन यांच्या मार्गदर्शनाखाली शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन चे ठाणेदार गोपाल उपाध्यय पोलीस उपनिरीक्षक मंगेश डांगे,पोलीस कॉस्टबल भुणेशवर तायडे,सुरेश धाकडे यांनी केली.