ग्रामीण पोलीस अधीक्षक यांची कार्यवाही 2लाख 35 हजार चा गुटखा जप्त,तर 46 देशी दारूच्या पेट्या केल्या परतवाडा येथून जप्त

0
1110

ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या टीम ची कार्यवाही
2लाख 35 हजार चा गुटखा जप्त,तर 46 देशी दारूच्या पेट्या केल्या परतवाडा येथून जप्त

चांदुर बाजार:-

सर्व महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी साठी सरकार सकारात्मक पाऊले उचलत असून यावर अमरावती जिल्ह्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री सुरू आहे.या वर अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना मिळालेल्या गुप्त माहिती च्या आधारे त्यांनी परतवाडा येथे रेड केली असता जवळपास 2लाख 35 हजार मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस स्टेशन परतवाडा येथिल शिंदी कॉलनी,कोर्ट रोड येथे अवैध गुटखा(तंबाखुजन्य)साठवला असल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या टीम ला मिळाली माहिती वरून अवैध गुटखा वर रेड केला असता आरोपी नामे प्रकाश बजाज वय 48 वर्षे व आरोपी गोपाल राजकुमार तेजवणी वय 27 वर्षे रा. शिंदी कॉलनी,कोर्ट रोड, परतवाडा हे मिळून आले.

आरोपी याचे राहत्या घरात 25 बोरे (कट्टे) गुटख्यासंबंधी मुद्देमाल मिळून आला. सदर अवैध गुटख्या अं.किंमत दोन लाख पस्तीस हजार रु.चा (2,35000/-)रु. चा अवैध गुटख्यासंबंधीचा मुद्देमाल माल मिळून आल्याने आरोपी यांचे विरुद्ध कारवाई करण्यात आली. सदर किंमतीचा गुटखा व तत्सम अन्न पदार्थांचा साठा जप्त केला असून पुढील कारवाई साठी अन्न औषध/पदार्थांचा विभाग अमरावती यांना पोलीस स्टेशन परतवाडा येथे करीत आहे.सदर ची कारवाई ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. हरी बालाजी एन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

तसेच 17/2/2020 रोजी पोलीस स्टेशन परतवाडा येथिल लालपूल येथे अवैध देशी दारू विक्रीचा साठा साठवून ठेवला आहे अशा मिळालेल्या गोपनीय माहिती वरून अवैदय देशी दारू वर रेड केला असता आरोपी नामे धरमसिंग जयसिंग बावरी वय 24 वर्षे रा. लालपुल परतवाडा हा मिळून आला. आरोपी याचे राहत्या घरात 46 अवैदय देशी दारूचे पेटी (देशी दारू बॉटल 2,508) असे मिळून आले. सदर दारू माल किंमत एक लाख छत्तीस हजार सहाशे चाळीस (1,36640/-)रु. चा अवैदय देशी दारू मुद्देमाल माल मिळून आल्याने आरोपी यांचे विरुद्ध कारवाई करण्यात आली. सदर कारवाई डॉ. बालाजी एन पोलीस अधिक्षक अमरावती ग्रामीण यांचे मार्गदर्शन खाली करणयात आली आहे. ,