जड वाहतूक मुळे काजळी ते चांदुर बाजार येथील मुख्य रस्त्यावर खड्डेच खड्डे सार्वजनिक बांधकाम ,लोकप्रतिनिधी यांचे याकडे दुर्लक्ष

181
जाहिरात

जड वाहतूक मुळे काजळी ते चांदुर बाजार येथील मुख्य रस्त्यावर खड्डेच खड्डे
सार्वजनिक बांधकाम ,लोकप्रतिनिधी यांचे याकडे दुर्लक्ष?

चांदुर बाजार

ग्रामीण भागाचा विकास व्हावा या साठी ग्रामीण भागातील रस्तेच विकास होणे फार आवश्यक आहे.यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात गावाला शहराला जोडणारे रस्ता बांधकाम जोरात सुरू आहे.मात्र काजळी ते माधान रोड चे बांधकाम 3 वर्षे पूर्वी च झाले मात्र अति प्रमाणात जात वाहतूक या रोडवरून सुरू असल्याने या रोडला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे.यामुळे एखादा मोठा अपघात बरोबर कंबरेचा समस्या सुद्धा वाढवीत असल्याचे पडलेल्या खड्यावरून दिसून येते.

काजळी येथील झेंडा चौक सिद्धिविनायक मंदिर ते काही अंतरावर असलेल्या सिमेंट च्या रोड वरील लोखंडी सिगा वर निघाल्या आहे.तसेच खड्यात पावसाचे पाणी जमा होत असल्याचे त्याची खोली चा अंदाज सुद्धा लागले कठीण आहे.वाहतूक करते वेळी या खड्या मोटरसायकल गेली असता मोठी दुर्घटना झाली तर याची जबाबदारी कोणाची हा प्रश्न आहे.

या गावातून मोठ्या प्रमाणात मुरूम ची वाहतूक करणारे ट्रक वाहतूक करीत आहे. अति जड वाहन असल्यामुळे येथे खड्डे पडले आहे.या कडे स्थानिक लोक प्रतिनिधी चे दुर्लक्षित असल्याने आता या कडे लक्ष देण्याची मागणी होते आहे.अश्याच प्रकारचे खडे माधान ते चांदुर बाजार,माधान ते ब्राम्हणवाडा थडी या रोडवर जीवघेणे खड्डे पडले आहे.त्यामुळे सार्वजनिक बांधकम विभाग आणि लोकप्रतिनिधी या कडे लक्ष द्यावे अशी मागणी होते आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।