राष्ट्रीय ॲबॅकस स्पर्धेमध्ये आकोटच्या विदयार्थ्यांची उत्तूंग भरारी…

0
813

अकोट च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

अकोटःसंतोष विणके

शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्था, अमरावती येथे पार पडलेल्या राष्ट्रीय ॲबॅकस व वैदिक मॅथ ऑलम्पियड या स्पर्धेमध्ये आकोटच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. येथील विराज आनंद लखोटिया याने बेसिक या गटामध्ये महाराष्ट्रातुन प्रथम क्रमांक पटकविला. तसेच ॲडव्हान्स फस्ट या गटामध्ये संस्कार अजय पांडे याने दुसरा क्रमांक ,पूर्व बेसिक गटामध्ये क्रिष्णा मनमित पखान हा तृतिय क्रमांकाचा मानकरी ठरला. तसेच मानसी शरद फोकमारे, संस्कृती अजय मावदे, पार्थ भावेश ओझा, अदिष्ठा दयाराम कळंबे हे पहिल्या दहामध्ये गुणवत्ता यादित आले.

तसेच इन्सपायरचे संचालक प्रविण बनसोड यांना टॉप टेन इन्सिटीटयुट अवार्डने सन्मानित करण्यात आले. हा सोहळा रेडियंट सुपर स्पेशालीटी हॉस्पिटल, अमरावतीच्या संचालक डॉ. माधुरी अग्रवाल, शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक, अभिजीतजी देशमुख तथा विदर्भ प्रबोधन मंडळचे संचालक जयसिंगराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संत ज्ञानेश्वर कला भवन अमरावती येथे मोठया दिमाखात पार पडला. विदयार्थ्यांच्या यशा करीता इन्सपायरच्या शिक्षीका प्रिती बनसोड तसेच संस्थेचे संचालक तथा वैदिक मॅथ प्रशिक्षक प्रविण बनसोड यांचे मार्गदर्शन लाभले.