तस्करांच्या तावडीतल्या ४५ गोवंशांना जीवदान

0
839

 

आकोटःसंतोष विणके

आकोट ग्रामीण पोलीसांची कारवाई

३ लाख ८१ हजाराचा मुद्देमाल जप्त

शहरानजीकच्या खुदावंतपूर शेतशिवारातुन आड मार्गाने घेऊन जाणाऱ्या ४५ गोवंशांना तस्करांच्या तावडीतुन सोडवत अकोट ग्रामीण पोलिसांनी जीवदान दिले.शुक्रवार(दि.२१) महाशिवरात्रीच्या दिवशी ग्रामिण पोलिसांनी ही धाडसी कारवाई करत घटनास्थळावरुन ३ लाख ८१ हजारांची गोवंशीय जनावरे जप्त केली.

काल खुदावंतपूर भागातून गोवंशाची मोठी तस्करी सुरु असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. तत्काळ ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या नेतृत्वात खुदावंत पुर परिसरात पाळत ठेवण्यात आली.यावेळी ४- ५ ईसम काही गोवंशाना हाकलतांना पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी रेड करताच ते पळुन जाण्यात यशस्वी ठरलेत. दरम्यान
पोलिसांनी घटनास्थळावरून ४५ गोवंश प्राण्यांना ताब्यात घेऊन अकोटच्या गोरक्षण संस्थेच्या ताब्यात दिले. या प्रकरणी पोलीसांनी कलम ५(ब)९ महा प्राणी संरक्षण अधिनियम सहकलम 199 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अन्वये अज्ञात चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपासात घेतला.ही कारवाई सुनील सोनवणे उपविभागीय पोलिस अधिकारी अकोट ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या नेतृत्वात पो.उपनिरिक्षक धर्माजी डाखोरे,एएसआय नारायण वाडेकर, गजानन भगत, मोतीराम गोंडचवर, प्रविण गवळी, नंदकिशोर कुलट, अनिल सिरसाट, वामन मिसाळ, रामेश्वर भगत, विजय साबळे, वामन मिसाळ व आरसीपी पथक यांनी केली.